(म्हणे) ‘संयुक्तपणे आतंकवादाचा उपद्रव नष्ट करूया !’ – पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो

पणजी – आतंकवादाचा सामना करण्यासाठी शांघाय सहकार्य परिषदेच्या सदस्य देशांनी सहकार्य करावे. आतंकवादाचे मूळ कारण शोधण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता आहे. आपल्या लोकांची सुरक्षा हे आपले सामूहिक दायित्व आहे. आतंकवादाचा वापर राजनैतिक साधन म्हणून करू नये.

आज संयुक्तपणे आतंकवादाचा उपद्रव नष्ट करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी शांघाय सहकार्य परिषदेत व्यक्त केले. परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.

(सौजन्य : TIMES NOW Navbharat)

तत्पूर्वी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी अध्यक्षस्थानावरून बोलतांना सीमापार आतंकवादासह सर्व प्रकारच्या आतंकवादाला आळा घालण्याचे आवाहन केले होते.