भाविकांना प्रथमच आदिकैलास पर्वतापर्यंत वाहनाने जाता येणार !

उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यात ४ मेपासून आदिकैलास आणि ओम पर्वत यात्रेला आरंभ होत आहे. भाविकांना प्रथमच तवाघाटहून आदिकैलास पर्वत आणि ओम पर्वत येथपर्यंत वाहनाने जाता येणार आहे.

८१ सहस्र डिटोनेटर्स (स्फोटके) आणि २७ सहस्र किलो अमोनियम नायट्रेट यांची तस्करी करणार्‍या २ जिहाद्यांना बंगालमधून अटक !

बंगाल हा जिहादी कारवायांचा अड्डा बनला असून त्यामुळे भारताची सुरक्षा धोक्यात आली आहे. हे लक्षात घेऊन तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !

काश्मीरमध्ये ७० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

२ तस्करांना अटक
सज्जाद बडाना आणि जहीर तंच अशी त्यांची नावे आहेत. 

उत्तरप्रदेशमध्ये भाजप नेत्याच्या मुलाच्या वाहनावर बाँबफेक !

प्रयागराज येथील भाजपच्या नेत्या विजयलक्ष्मी चंदेल यांचा मुलगा विधान सिंह यांच्या चारचाकी वाहनावर ४ अज्ञात आक्रमणकर्त्यांनी २ बाँब फेकले. हे आक्रमणकर्ते २ गाड्यांवर आले होते. झूसी भागात ६ एप्रिलला रात्री ही घटना घडली.

पुणे येथे प्रवाशांना लुबाडणार्‍या साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह ६ कर्मचार्‍यांचे निलंबन !

असे भ्रष्ट आणि लोभी पोलीस समाजात होणारा भ्रष्टाचार आणि लूट कशी रोखणार ? यासाठी सक्षम, कर्तव्यदक्ष आणि चारित्र्यवान पोलिसांची भरती केली, तरच भारतीय पोलीसयंत्रणा सक्षम होईल !

जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद्यांची संख्या झाली अल्प ! – पोलीस महासंचालक  

काश्मीरमधील आतंकवाद्यांची संख्या अल्प झाली, असे म्हटले, तरी अद्यापही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षितच आहेत. भारतातील कोणत्याही राज्यातील हिंदू तेथे जाऊन राहू शकत नाहीत, अशीच स्थिती आहे !

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणार्‍यांनी स्वतःची पात्रता ओळखून घ्यावी ! – शिवाजीराव पाटील, माजी खासदार

स्वातंत्र्यलढ्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यावर टीका करणारे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना देशाविषयी प्रेम नाही. सावरकरांवर टीका करणार्‍यांनी आधी त्यांची पात्रता ओळखून घ्यावी, अशी टीका त्यांनी केली.

ऊस वाहतूकदारांची ७ कोटींची फसवणूक !

या वर्षीच्या साखर हंगामात श्री सोमेश्वर कारखान्याच्या ऊस वाहतूकदारांची ९३ टोळ्यांकडून तब्बल ७ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या माहितीनुसार राज्यात वाहतूकदारांची मुकादमांकडून ४४६ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपकीर्तीला ‘सावरकर गौरव यात्रा’ हे चपखल उत्तर ! – अभिनेते शरद पोंक्षे

देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वा. सावरकर यांनी स्वत:च्या आयुष्याची होळी केली. अशा महान सुपुत्राचा गौरव व्हायला हवा होता; मात्र काँग्रेसने गलिच्छ राजकारण करून स्वा. सावरकर यांना अपकीर्त करण्याचे काम केले. त्यामुळे ‘सावरकर कोण होते ?’ हे सांगण्याची आज आवश्यकता निर्माण झाली.