महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी रेल्वे स्थानक ते कार्यक्रम स्थळापर्यंत विनामूल्य बस सुविधा !

या कार्यक्रमासाठी देशभरातून येणार्‍या भाविकांना जवळील रेल्वे स्थानकापासून कार्यक्रमस्थळी नेण्यासाठी शासनाने विनामूल्य बस सुविधा उपलब्ध करून दिली आहे,

तुळजापुरातील मदरसा आणि मुसलमान स्मशानभूमी येथे चालू असलेले अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावे !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात का येत नाही ?

पुणे महापालिकेतील १३२ कनिष्ठ अभियंत्यांचे स्थानांतर ! 

येथील महापालिकेमध्ये वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करणार्‍या १३२ कनिष्ठ अभियंत्यांचे तडकाफडकी स्थानांतर करण्यात आले. त्यामध्ये स्थापत्य पदावरील १०९, विद्युत् पदावरील १७ आणि यांत्रिकी पदावरील ६ अभियंत्यांचा समावेश आहे.

सातारा जिल्हा काळी-पिवळी टॅक्सी, जीप आणि टुरिस्ट, वाहतूक संघटना यांची १७ एप्रिलला उपोषणाची चेतावणी !

येथील जिल्हा काळी-पिवळी टॅक्सी, जीप आणि टुरिस्ट, वाहतूक संघटनेने शासनाच्या प्रवासी वाहतुकीविषयी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात वाहनांसह १७ एप्रिल या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपोषण करणार असल्याची चेतावणी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांना निवेदनाद्वारे दिली आहे.

एस्.टी.ला ३४ सहस्र नवीन तिकिटे देणारी यंत्रे मिळणार !

प्रवाशांना तिकीट देण्यासाठी एस्.टी.ने ‘इबिक्स कॅश’ आस्थापनासमवेत नवा करार केला असून लवकरच ३४ सहस्र नवीन तिकिटे देणारी यंत्रे मिळणार आहेत.

‘जी-२०’ आरोग्य क्षेत्र कार्यगटाच्या बैठकीसाठी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी गोव्यात

‘जी-२०’ आरोग्य गटाच्या बैठकीसाठी स्वित्झर्लंड देशातील ७, तर अमेरिकेतील २ प्रतिनिधींचे गोव्यात आगमन झाले. ‘जी-२०’ परिषदेच्या आरोग्य गटाची गोव्यात होणारी ही दुसरी बैठक आहे.

देहलीत भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या !

गुंडांना पोलिसांचा जराही वचक राहिला नसल्यानेच ते दिवसाढवळ्या कुणाचीही हत्या करू धजावतात ! हे चित्र पालटण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे !

नगर येथे धर्मांधांनी व्यापार्‍यांवर केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ व्यापार्‍यांचे ठिय्या आंदोलन

येथे दुकानासमोर बॅरिकेड लावण्याच्या वादातून झालेल्या भांडणात एका गटाकडून २ व्यापार्‍यांवर चाकूने आक्रमण करण्यात आले. या घटनेमुळे आक्रमक झालेल्या व्यापार्‍यांनी १५ एप्रिल या दिवशी बाजारपेठ बंद ठेवली. कापड बाजारपेठेत ठिय्या आंदोलन करण्यात आले.

रत्नागिरीतील रस्त्यांच्या कामासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्याकडून उच्च न्यायालयात याचिका  

‘विशेष रस्ते अनुदाना’तून करण्यात आलेल्या रस्त्यांवर योजनेचे नाव पालटून कोट्यवधी रुपये काँक्रिटिकरणाच्या नावाखाली घातले जात आहेत.

नाशिक पुणे मार्गे मंडणगड एस्.टी. बससेवा कायमस्वरूपी चालू करा !

नाशिक पुणे मंडणगड बससेवा कायमस्वरूपी चालू ठेवण्यात आल्यास ओझर येथील विघ्नहर गणपति येथे जाण्यासाठी मोठी सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच एस्.टी. महामंडळाचे उत्पन्न आणि प्रवासी संख्येत वाढ होईल.