नगर येथे धर्मांधांनी व्यापार्‍यांवर केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ व्यापार्‍यांचे ठिय्या आंदोलन

कापड बाजारपेठेत करण्यात आलेले ठिय्या आंदोलन

नगर – येथे दुकानासमोर बॅरिकेड लावण्याच्या वादातून झालेल्या भांडणात एका गटाकडून २ व्यापार्‍यांवर चाकूने आक्रमण करण्यात आले. यामध्ये दीपक नवलानी आणि प्रवीण बोगावत घायाळ झाले आहेत. पोलिसांनी आक्रमणकर्त्याला अटक केली आहे; मात्र या घटनेमुळे आक्रमक झालेल्या व्यापार्‍यांनी १५ एप्रिल या दिवशी बाजारपेठ बंद ठेवली. कापड बाजारपेठेत ठिय्या आंदोलन करण्यात आले. विविध व्यापारी संघटना आणि सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी यांमध्ये सहभागी झाले होते.

पोलिसांनी तैनात केलेला फौजफाटा

पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. या घटनेत घायाळ झालेले दीपक नवलानी यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यातील अमर हमीद शेख आणि रिजवान सय्यद यांना अटक करण्यात आली आहे. हमजा शौकत आली शेख आणि त्याचा धाकटा भाऊ हे पसार आहेत.

संपादकीय भूमिका

  • प्रत्येक गुन्ह्यामध्ये धर्मांध पुढे असतातच. अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
  • आक्रमणकर्त्या धर्मांधांवर कारवाईची मागणी व्यापार्‍यांनाच करावी लागणे हे पोलिसांना लज्जास्पद !