एस्.टी.ला ३४ सहस्र नवीन तिकिटे देणारी यंत्रे मिळणार !

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर – प्रवाशांना तिकीट देण्यासाठी एस्.टी.ने ‘इबिक्स कॅश’ आस्थापनासमवेत नवा करार केला असून लवकरच ३४ सहस्र नवीन तिकिटे देणारी यंत्रे मिळणार आहेत. सध्याची जुनी यंत्रे ही सदोष असून त्याच्या अनेक तक्रारी एस्.टी.ला नियमित प्राप्त होत आहेत. यंत्र लवकर चालू न होणे, कधीही बंद पडणे, भारित न होणे, अक्षरे न दिसणे, लवकर तिकीट प्राप्त न होणे यांसह असंख्य तक्रारींची नोंद घेत वाहक, प्रवासी यांना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन एस्.टी.ने नवीन आस्थापनासमवेत करार केला. एस्.टी.च्या सध्याच्या प्रणालीतील सुमारे ४२ टक्के यंत्रे नादुरुस्त आहेत.