‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही !

फवाद खान याचा ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यासाठी हालचाली चालू आहेत. चीड आणणारी गोष्ट म्हणजे भारतीय आस्थापनांनी चित्रपट प्रदर्शनासाठी पायघड्या घातल्या आहेत.

वडूज (जिल्हा सातारा) येथे नगरसेवकांचे उपोषण !

नगरसेवकांनाच उपोषण करायला लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ?

ठाणे येथे चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आलेल्या २ मुसलमानांना अटक !

चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आणलेल्या महंमद शेख (वय २९ वर्षे) आणि अम्मार महंमद अन्सारी (वय २१ वर्षे) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने सापळा रचून अटक केली आहे.

९ ते २३ डिसेंबर कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश !

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात महाविकास आघाडीने १० डिसेंबरला आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनात सीमाभागातील मराठी भाषिकही सहभागी होण्याची शक्यता आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत ‘एम्.आय.एम्.’च्या सर्व १३ उमेदवारांची अनमात रक्कम जप्त !

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील दारूण पराभवाविषयी म्हणाले आमच्या पक्षाच्या १३ उमेदवारांना मिळून १ लाख मते मिळाली आहेत, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

चिंचवड (पुणे) येथे आजपासून श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव !

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव १० ते १४ डिसेंबर या कालावधीत चिंचवड येथे साजरा होणार आहे. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थ यांनी वतीने धार्मिक कार्यक्रम, सुगम संगीत, जुगलबंदी, व्याख्यान, ..

‘युपीआय’वरील आर्थिक व्यवहाराच्या मर्यादा निश्‍चित

‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एखादी व्यक्ती आता ‘युपीआय’द्वारे प्रतिदिन केवळ १ लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकणार आहे.

कसायांशी संगनमत करून कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्‍या हडपसर (पुणे) येथील पोलीस निरीक्षकावर कारवाई करावी ! – गोरक्षकांचे पुणे पोलिसांना निवेदन

सराईतपणे गोतस्करी करणारा मयनू कुरेशी ५ डिसेंबर या दिवशी फलटण येथे त्याच्या गाडीमधून १२ लहान-मोठ्या म्हशी अवैधपणे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर गोरक्षकांनी ती गाडी हडपसर येथील मांजरीच्या दिशेने जात असतांना पकडली.

‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवम् पारमार्थिक सेवा ट्रस्ट’ यांच्या वतीने आयोजित औदुंबर भंडारा भावपूर्ण वातावरणात पार पडला !

प.पू. भक्तराज महाराज रचित भजने म्हणण्यात आली. कृष्णा नदीच्या काठावर पादुकांना स्नान घालण्यात आले. दुपारी भंडारा करण्यात आला. या प्रसंगी डॉ. (सौ.) कुंदा आठवले या उपस्थित होत्या.

नक्षलवादी चळवळीचे समर्थक कोबाड गांधी यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाला राज्यशासनाचा अनुवादाचा पुरस्कार !

सातत्याने नक्षलवादी आणि माओवादी यांच्याकडून जनता, पोलीस अन् सैनिक यांच्या हत्या, होत असतांना नक्षलवाद्यांचे समर्थक कोबाड गांधी यांना पुरस्कार देणे हे लज्जास्पद आहे.