९ ते २३ डिसेंबर कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश !

कोल्हापूर – महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात महाविकास आघाडीने १० डिसेंबरला आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनात सीमाभागातील मराठी भाषिकही सहभागी होण्याची शक्यता आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पहाता जिल्हा प्रशासनाने ९ ते २३ डिसेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश घोषित केला आहे. (३७ (१) अ ते फ आणि कलम ३७ (३) लागू) या आदेशान्वये ५ किंवा अधिक लोकांनी एकत्र येणे, जमाव जमवणे, मिरवणुका काढणे, तसेच सभा घेण्यास बंदी असणार आहे. जमावबंदी आदेश विवाह, इतर धार्मिक कार्यक्रम, सण, यात्रा यांना लागू होणार नाहीत.