चिपळूण तालुक्यातील कळवंडे धरणाच्या भिंतीला दिला प्लास्टिकचा आधार

निकृष्ट काम करणारा ठेकेदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून या कामाचा सर्व पैसा वसूल करायला हवा !, तरच अशा प्रकारांना थोडा तरी आळा बसेल !

मुंबईहून बँकॉकला अवैधरित्‍या परदेशी चलन नेणार्‍या थायलंडमधील ४ महिलांना अटक !

सातत्‍याने घडणार्‍या अशा स्‍वरूपाच्‍या गुन्‍ह्यांवर नियंत्रण आणण्‍यासाठी मुंबई विमानतळ प्रशासनाने ठोस उपाय योजावेत !

केंद्र सरकारने घुसखोरांविषयी कडक पावले न उचलल्‍यास भारताचे हाल फ्रान्‍ससारखे होतील ! – अनिल धीर, संयोजक, इंडियन नॅशनल ट्रस्‍ट फॉर आर्ट अँड कल्‍चरल हेरिटेज

एक ‘सेक्‍युलर’ (निधर्मी) देश म्‍हणून युरोपमध्‍ये फ्रान्‍सचे उदाहरण दिले जाते. आता फ्रान्‍समध्‍ये ज्‍या दंगली होत आहेत, त्‍या अचानक होत नसून त्‍याची सिद्धता गेल्‍या ३० ते ४० वर्षांपासून चालू आहे. आज फ्रान्‍समध्‍ये लादलेल्‍या धर्मनिरपेक्षतेच्‍या अपयशाचे गंभीर परिणाम तेथील नागरिक भोगत आहेत.

‘पत्रकार कल्‍याण निधी समिती’वर ‘हिंदुस्‍थान पोस्‍ट’चे संपादक स्‍वप्‍नील सावरकर यांची निवड !

राज्‍यातील ७ प्रतिष्‍ठित माध्‍यमांतील प्रतिनिधींचा या समितीमध्‍ये ‘अशासकीय सदस्‍य’ म्‍हणून समावेश करण्‍यात आला आहे. त्‍यामध्‍ये श्री. स्‍वप्‍नील सावरकर यांचा समावेश आहे.

ठाणे येथे सनातन संस्‍थेच्‍या वतीने ३ दिवसांचे बिंदूदाबन शिबिर उत्‍साही वातावरणात पार पडले !

शिबिरामध्‍ये हाता-पायांवरील बिंदूदाबन यांसह झोप न येणे, डोके दुखणे अशा वेगवेगळ्‍या त्रासांवर चेहर्‍यावरील बिंदूदाबन शिकवण्‍यात आले.

किशोर आवारे खून प्रकरणातील मुख्‍य सूत्रधार पोलिसांच्‍या कह्यात !

संबंधित प्रकरणी पोलिसांनी ५ आक्रमणकर्त्‍यांसह दीड मासापासून फरार असलेले चंद्रभान खळदे यांनाही नाशिक परिसरातून कह्यात घेतले.

‘रिंग रोड नको’ आणि उड्डाणपुलाच्‍या दिरंगाईचा निषेध म्‍हणून शिवरे (पुणे) ग्रामस्‍थांचे महामार्गावर आंदोलन !

शिवरे फाटा येथील उड्डाणपुलाचे काम त्‍वरित करावे, यासाठी हे रस्‍ता बंद आंदोलन केले होते. २२३ एकर बागायती क्षेत्र यामध्‍ये संपादित होणार असल्‍याने ‘जगायचे कसे ?’ असा प्रश्‍न ग्रामस्‍थांनी उपस्‍थित केला.

सरखेल कान्‍होजी आंग्रे यांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्त अभिवादन दुचाकी फेरीचे आयोजन !

या फेरीचे उद़्‍घाटन कान्‍होजी आंग्रे यांचे ९ वे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्‍या हस्‍ते दिवाळे बंदर येथे होणार आहे. या फेरीत अनेक सामाजिक संस्‍था आणि कोस्‍टल गार्ड सहभागी होणार आहेत.

मंत्रीमंडळाच्‍या खातेवाटपाचा तिढा कायम, भाजपचे वरिष्‍ठ नेते हस्‍तक्षेप करणार !

राष्‍ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्‍यासाठी अर्थमंत्रीपदाची मागणी करण्‍यात येत आहे; मात्र भाजप आणि शिवसेना अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्‍यास अनुकूल नसल्‍याचे पुढे आले आहे.

आज विशाळगड येथील अतिक्रमणाच्‍या विरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकणार ! – नितीन शिंदे

शूर मावळ्‍यांच्‍या बलीदानाने पावन झालेल्‍या विशाळगडावर धर्मांधांनी अवैध अतिक्रमण करून संपूर्ण गड विद्रुप केला आहे. त्‍याच्‍या विरोधात सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या वतीने गुरुवार, १३ जुलैला सांगली येथे सकाळी १०.३० वाजता लोकमान्‍य टिळक स्‍मारक मंदिर येथे आंदोलनाचे रणशिंग फुंकण्‍यात येणार आहे