कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून कोरोना संसर्गामुळे एकही मृत्यू नाही ; रुग्णसंख्याही घटली

घटत्या रुग्णसंख्येमुळे कोरोना केंद्रही बंद होत असून आरोग्य यंत्रणेवरील ताण आता अत्यल्प झाला आहे.

जनता वसाहतींमध्ये रहाणार्‍या कुटुंबाला ९८ सहस्र ७८० रुपयांचे वीजदेयक !

महावितरणच्या गोंधळामुळे त्यांनी जनतेची विश्‍वासार्हता गमावली आहे.

नव्या कृषी कायद्यातून शेतकर्‍यांचा कसलाही लाभ नाही ! – सतेज पाटील, गृहराज्यमंत्री, काँग्रेस

स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ राज्य केलेल्या काँग्रेसने त्या त्या वेळी शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवले असते, तर शेतकर्‍यांवर आंदोलन करण्याची वेळ आलीच नसती !

पुण्यातील नोबेल रुग्णालयात रशियन बनावटीच्या लसीची दुसर्‍या टप्प्यातील चाचणी चालू

‘गॅमेलिया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इपीडेमीओलॉजी अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजी’ आणि ‘रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड’ (आर्.डी.आय.एफ्.) हे एकत्रितरित्या ‘स्फुटनिक-५’ ही लस सिद्ध करत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात १३५ पाणीपुरवठा योजना रखडल्या !

राजकीय साठमारीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा योजना प्रलंबित रहात असतील, तर जनतेच्या कराची होणारी उधळपट्टी कधीच थांबणार नाही.

मुंबई-गोवा महामार्गावर लावण्यात आलेल्या माहितीदर्शक फलकांवर व्याकरणाच्या अनेक चुका !

पाट्याटाकूपणे काम करणार्‍या ठेकेदारांवर कारवाई करणे आवश्यक !

सिंधुदुर्गातील कोरोनाविषयीची सद्य:स्थिती

दळणवळण बंदीमध्ये शिथिलता आली, याचा अर्थ कोरोनाचे संकट टळले असे नाही, हे जिल्ह्यात वाढणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवरून लक्षात येते. जनतेने कोरोनाविषयीच्या शासकीय आणि वैद्यकीय नियमांचे पालन करणेच योग्य !

१२ लाख रुपयांची अवैध मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

सातत्याने गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्रात अवैध मद्याची वाहतूक होत असल्याच्या घटना उघड होत आहेत. पोलिसांनी कारवाई केली, तरीही हे प्रकार चालूच आहेत.

राज्यातील ‘जलक्रीडा’ चालू करण्याविषयी लवकरच आदर्श कार्यप्रणाली ! – अस्लम शेख, मत्स्यव्यवसाय मंत्री, महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये पर्यटन व्यवसायाला अनुकूल वातावरण आहे. रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता या क्षेत्रामध्ये आहे.

बंदुकीची गोळी लागून युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी चौघांना पोलीस कोठडी

युवराज दीपक वारंग (वय १८ वर्षे) या युवकाचा २६ नोव्हेंबरला छातीत बंदुकीची गोळी (छरा) घुसून मृत्यू झाला होता. या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी ४  संशयितांना अटक केली अन् त्यांच्याकडून २ बंदूका कह्यात घेतल्या.