‘खुदा हाफीज : चॅप्टर २-अग्नीपरीक्षा’ या हिंदी चित्रपटाच्या निर्मात्यांची जाहीर क्षमायाचना !

मुसलमानांनी विरोध केल्यावर चित्रपट निर्माते तातडीने क्षमा मागत आक्षेपार्ह गोष्ट काढून टाकतात. याउलट हिंदूंनी कितीही विरोध केला, तरी त्यांच्या देवतांचा अवमान थांबवला जात नाही, हे ‘पीके’ यांसारख्या चित्रपटांतून अनेकदा निदर्शनास आले आहे.

जळगाव येथील कु. मनस्वी नीलेश पाटील आणि कु. तेजल अजय नेवे यांचे इयत्ता १० वीच्या परीक्षेतील यश !

गुरुकृपेमुळेच हे शक्य झाले. अभ्यास करण्याआधी मी गणपती अथर्वशीर्ष म्हणायचे. परीक्षा प्रारंभ होण्यापूर्वी ‘तुम्हीच माझ्याकडून प्रश्नपत्रिका  सोडवून घ्या आणि येणारे सर्व अडथळे दूर होऊ दे’, अशी प्रार्थना गुरुदेवांना करायचे.

कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांच्या हत्या करणाऱ्यांना फाशी द्या !

राजस्थानमधील कन्हैयालाल, तसेच महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे या हिंदूंच्या हत्या करणाऱ्यांना फाशी द्यावी, तसेच त्यांना साहाय्य करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.

उमेश कोल्हे यांची हत्या झालेली असतांना दरोड्याचा बनाव रचला !

पशूवैद्य डॉ. युसूफ खान हा उमेश कोल्हे यांचा गेल्या १५ वर्षांपासूनचा मित्र आहे; मात्र युसूफ याने उमेश यांचा विश्वासघात केला.

कन्हैयालाल यांच्या हत्येचा निषेध करत कल्याण येथे आंदोलन !

उदयपूर येथे कन्हैयालाल यांची गळा चिरून निर्घृण हत्या करणाऱ्यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत ३ जुलै या दिवशी कल्याण येथील हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलन केले.

जम्मूमध्ये अटक करण्यात आलेला आतंकवादी भाजपच्या ‘माहिती आणि तंत्रज्ञान शाखे’चा प्रमुख !

गावकऱ्यांनी पकडून दिलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या २ आतंकवाद्यांपैकी तालिब हुसेन शाह हा एक आतंकवादी भाजपचा जम्मू विभागाच्या माहिती आणि तंत्रज्ञान शाखेचा प्रमुख होता, अशी माहिती समोर आली आहे.

अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा युतीचीच सत्ता येईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

शरद पवार जे म्हणतात, नेहमी त्याच्या विरुद्ध होते. त्यामुळे त्यांनी सरकार पडेल म्हटले, म्हणजे आमचे शासन अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि पुढील निवडणुकीतही युतीचीच सत्ता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनील प्रभु यांची नियुक्ती रहित !

शिवसेनेच्या १६ आमदारांना शिंदे गटाकडून ‘व्हीप’ बजावण्यात आला आहे. ‘व्हीप’ न पाळल्यास आमदारकी रहित करण्याची प्रक्रिया शिंदे गट करू शकतो.

उमेश कोल्हे हत्या प्रकरणात विदेशी शक्ती आहे का ? याची चौकशी होणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करण्यापर्यंत जाणारी धर्मांधांची मजल मोडून काढण्यासाठी नवे सरकार पावले उचलेल, ही अपेक्षा !

सभागृहात विलंबाने पोचल्याने काँग्रेसच्या ५ आमदारांना मतदानापासून मुकावे लागले !

बहुमत चाचणीला वेळेवर उपस्थित न राहिल्याने त्यांना मतदान करता आले नाही. वेळेचे गांभीर्य नसलेले असे लोकप्रतिनिधी जनतेची कामे वेळेवर करत असतील का ?