जम्मू (जम्मू-काश्मीर) – गावकऱ्यांनी पकडून दिलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या २ आतंकवाद्यांपैकी तालिब हुसेन शाह हा एक आतंकवादी भाजपचा जम्मू विभागाच्या माहिती आणि तंत्रज्ञान शाखेचा प्रमुख होता, अशी माहिती समोर आली आहे. या आतंकवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि एके-४७ बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. तालिब हुसेन शाह याचे जम्मू-काश्मीरमधील भाजपचे अध्यक्ष रवींद्र रैना यांच्यासह अनेक वरिष्ठ भाजप नेत्यांसमवेतची छायाचित्रेही समोर आली आहेत.
भाजपचे प्रवक्ते आर्.एस्. पठानिया यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, ऑनलाइन पद्धतीने सदस्यत्व दिल्याने हा प्रकार घडला आहे. अशाप्रकारे सदस्यत्व देतांना संबंधित सदस्याची पार्श्वभूमी तपासली जात नाही. त्याला थेट सदस्यत्व दिले जाते. त्यामुळे भाजपमध्ये कुणीही प्रवेश करू शकतो. हे भाजपच्या विरोधातील षड्यंत्र आहे.
संपादकीय भूमिकाकन्हैयालाल यांच्या हत्येतील आरोपीचेही भाजपशी संबंध असल्याचे समोर आल्याने भाजपला अपकीर्त करण्यासाठी जिहादी आतंकवादी भाजपमध्ये जाऊन त्याचे सदस्यत्व घेत आहेत का ? याची चौकशी झाली पाहिजे ! |