उमेश कोल्हे यांची हत्या झालेली असतांना दरोड्याचा बनाव रचला !

आमदार नवनीत राणा यांचा काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप !

आरोपी

अमरावती – औषध विक्रेता उमेश कोल्हे यांची हत्या झालेली आहे. असे असतांना ‘येथील काँग्रेसच्या नेत्या आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांनी या घटनेत दरोड्याचा बनाव रचण्यासाठी येथील पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर दबाव आणला होता’, असा आरोप आमदार रवि राणा यांनी ३ जुलै या दिवशी केला.

अमरावती पोलिसांनी उमेश कोल्हे हत्या प्रकरण नूपुर शर्मा प्रकरणामुळेच झाल्याचे स्पष्ट केले आहे. ‘या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात होऊन आरोपींना कठोर शिक्षा करावी’, अशी मागणी उमेश कोल्हे यांचे बंधू महेश यांनी केली आहे.

धर्मांध मित्राकडून उमेश कोल्हे यांचा घात !

पशूवैद्य डॉ. युसूफ खान हा उमेश कोल्हे यांचा गेल्या १५ वर्षांपासूनचा मित्र आहे; मात्र युसूफ याने उमेश यांचा विश्वासघात केला. उमेश यांनी ‘व्हॉट्सॲप’च्या गटात नूपुर शर्मा यांच्याशी संबंधित ‘पोस्ट’ ‘फॉरवर्ड’ केली होती. आरोपी डॉ. युसूफ याने त्या ‘पोस्ट’चे छायाचित्र (स्क्रीनशॉट) काढून अन्य मुसलमानांच्या गटांमध्ये पाठवले. त्यानंतर कोल्हे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला, असे समजते.

संपादकीय भूमिका

धर्मांधांशी मैत्री करणे किती धोकादायक आहे, हे यावरून लक्षात येते !