नगराध्यक्ष आणि सरपंच पदाच्या निवडणुका थेट जनतेतून करणारे सुधारणा विधेयक विधानसभेत संमत !

सरपंच आणि नगराध्यक्ष या पदांची निवडणूक थेट जनतेमधून करणारे विधेयक २२ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत संमत करण्यात आले.

शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त श्री सिद्धरामेश्वर मंदिर भाविकांनी गजबजले !

शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त येथील ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात पहाटेपासून धार्मिक विधी चालू करण्यात आले होते. या निमित्ताने सहस्रो भाविकांनी श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेतले.

कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्याना’स विद्यार्थ्यांचा प्रतिसाद ! 

हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्यानां’चे नियोजन करण्यात आले होते.

सिटी हायस्कूल येथे संस्कृत भाषादिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सनातन संस्थेच्या साधिका सौ. संपदा पाटणकर यांचा विशेष सहभाग ! 

या कार्यक्रमात सौ. संपदा अमित पाटणकर यांनी विद्यार्थ्यांना ‘भारतीय संस्कृती आणि संस्कार यांचा संस्कृत भाषेशी असलेला संबंध’, यावर मार्गदर्शन केले.

सहभागाची निश्चिती झाल्याविना संचालकांवर कारवाई करता येणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. या अधिकोषाचे अध्यक्ष सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत असून त्यांची चौकशी चालू आहे.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी ‘इंटेलिजन्स युनिट’ सिद्ध करणार !

सायबर गुन्हे रोखण्यासाठी गुन्हेगारांना तात्काळ आणि कठोर शिक्षा होणे अत्यंत आवश्यक आहे !

यापुढील काळात हिंदु समाज श्री गणेशाचे विडंबन सहन करणार नाही ! – नीलेश निढाळकर, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता

केवळ हिंदूंच्याच सणाच्या वेळी प्रदूषण होते का ? केवळ हिंदूंचे सण-उत्सव आले की नोटीस पाठवली जाते. हा पक्षपात नाही का ?

साधनेमुळे आपण जीवनात स्थिर राहू शकतो ! – श्रीमती अश्विनी जरंडीकर, सनातन संस्था 

जीवनात साधनेचे अनन्यसाधारण महत्त्व असून साधनेमुळेच आपण जीवनात स्थिर राहू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने नियमित साधनेचे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या साधिका श्रीमती अश्विनी जरंडीकर यांनी केले.

महानंद दूध महासंघावर प्रशासकाची नियुक्ती करणार !

मुंबई येथील महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मर्यादित असलेल्या महानंद दूध महासंघात अपप्रकार आणि उतरती कळा लागण्याला संचालक मंडळ उत्तरदायी आहे. महासंघातील अनियमिततेविषयी सरकार बघ्याची भूमिका घेणार नाही.

‘पितांबरी सांस्कृतिक मंचा’च्या वतीने ‘कॉर्पोरेट कीर्तन’ कार्यक्रमाचे आयोजन !

या प्रसंगी प्रा. अशोक चिटणीस यांनी ‘समर्थ रामदासस्वामींचे विचार तरुण पिढीसमोर प्रकर्षाने येण्याची आवश्यकता आहे’, असे सांगून अशा स्तुत्य उपक्रमाविषयी पितांबरीला धन्यवाद दिले.