सिटी हायस्कूल येथे संस्कृत भाषादिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सनातन संस्थेच्या साधिका सौ. संपदा पाटणकर यांचा विशेष सहभाग ! 

कार्यक्रमात मार्गदर्शन करतानां सौ. संपदा पाटणकर (उजवीकडे), तसेच मान्यवर

सांगली – सिटी हायस्कूल येथे संस्कृत भाषादिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सनातन संस्थेच्या साधिका आणि संस्कृत शिक्षिका सौ. संपदा अमित पाटणकर यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सौ. संपदा अमित पाटणकर यांनी विद्यार्थ्यांना ‘भारतीय संस्कृती आणि संस्कार यांचा संस्कृत भाषेशी असलेला संबंध’, यावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी सिटी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. काळे, तसेच सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सौ. सूर्यवंशी उपस्थित होत्या.

कार्यक्रमप्रसंगी उपस्थित सौ. संपदा पाटणकर (उजवीकडे), तसेच मान्यवर

सौ. संपदा अमित पाटणकर यांचा परिचय !

सौ. संपदा अमित पाटणकर यांनी संस्कृत विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून त्या गेली २४ वर्षे संस्कृत संवर्धन मंडळात कार्यकर्ता म्हणून सक्रिय सहभागी आहेत. त्या विविध संस्कृत स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून सहभागी असून २१ वर्षे संस्कृतचे शिकवणीवर्ग घेत आहेत.