महाराष्ट्रात ‘महाकवी कालिदास’ पुरस्कार वितरणाचा केला जात आहे सोपस्कार !

संस्कृत भाषेचा प्रचार, प्रसार, संशोधन, प्रकाशन, अध्ययन, अध्यापन आणि संस्कृत भाषेविषयी अन्य उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

श्रीरामपूर (नगर) येथे ‘लव्ह जिहाद’च्या  विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक !

हिंदु धर्माच्या मुळाशी उठलेल्या षड्यंत्राच्या सहस्रावधी घटना घडूनही आज त्यावर आळा घालण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कायदा येऊ शकलेला नाही, हे दुर्दैवी आहे. सरकारने या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करून सत्य जनतेसमोर आणावे !

नागपूर येथे नैसर्गिक पद्धतीने पूर्ण नष्ट होणार्‍या श्री गणेशमूर्तींनाच शासनाची अनुमती !

‘राज्यात नैसर्गिक पद्धतीने पूर्णपणे नष्ट होणार्‍या श्री गणेशमूर्तींनाच अनुमती दिली जाईल. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (पीओपी) श्री गणेशमूर्तींवर बंदी घालण्यात येणार आहे, असे आगामी गणेशोत्सवाविषयी राज्यशासनाने तात्पुरते धोरण सिद्ध केले आहे.

विशाळगडावरील अतिक्रमण न हटवल्यास मनसे पद्धतीने काढून टाकू ! – युवराज काटकर, मनसे जिल्हाउपाध्यक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुरातत्व विभागाच्या निषेधार्थ आंदोलन !

(म्हणे) ‘श्री गणेशमूर्ती विसर्जन ओढे, नदी, तलाव आणि धरण येथे न करता हौदात करा !’

अन्य धर्मियांविषयी अशी शास्त्रविरोधी भूमिका घेण्याचे धाडस प्रशासनाने दाखवले असते का ?

नगर येथे गणेशोत्सव मंडळे आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते यांच्या विरोधानंतर पोलिसांनी दिली मिरवणुकीस अनुमती !

बैठकीमध्ये काही गणेशोत्सव मंडळांना स्थापनादिनाच्या दिवशी मिरवणूक काढण्यास अनुमती नाकारण्यात आली आणि ‘मिरवणूक काढली, तर कारवाई करू’, असा दम देण्यात आला.

श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी पुणे येथे पाचव्या दिवसापासून फिरते हौद !

हौदात विसर्जित केलेल्या मूर्ती खड्डे बुजवण्यासाठी, विहिरी बुजवण्यासाठी वापरल्या जातात, हा अनुभव आहे. शासनाने हे श्री गणेशमूर्तीचे विडंबन थांबवण्यासाठी, गणेशभक्तांना श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार विसर्जित करण्यासाठी सोय उपलब्ध करून द्यावी.

टिकली न लावता श्री गणेशाचे स्वागत करणार्‍या अभिनेत्रीच्या विज्ञापनास आक्षेप !

गणेशोत्सवाच्या औचित्यावर ‘रिलायन्स मार्ट’च्या वतीने करण्यात आलेल्या एका विज्ञापनाला विरोध होत आहे. ‘रिलायन्स मार्ट’च्या विज्ञापनात मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने टिकली न लावता श्री गणेशाचे स्वागत केल्याचे दाखवण्यात आले आहे.

श्री गणेशमूर्ती दान करण्याचे, तसेच फिरत्या हौदात विसर्जन करण्याचे पुणे महापालिकेचे आवाहन !

नैसर्गिक जलस्रोतात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करू नये, असे आवाहन करतांनाच महापालिकेने केवळ शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींचे घरच्या घरी विसर्जन करावे, तसेच ‘पीओपी’च्या मूर्तींचे फिरत्या हौदात विसर्जन करावे किंवा मूर्तीदान करावे, असे सांगितले आहे

मुंबई आणि नवी मुंबईत कृत्रिम तलावापेक्षा पारंपरिक विसर्जनाला भाविकांची पसंती !

२ सप्टेंबरला पहाटे ६ वाजेपर्यंत दीड दिवसाच्या ६० सहस्र श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.