कराड येथे २ धर्मांधांकडून नागरिकांना मारहाण करत दहशत माजवण्याचा प्रयत्न !

येथील बैल बाजारा रस्त्यावर मोरया वसाहत परिसरात २ धर्मांधांनी केशकर्तनालय (सलून) व्यावसायिकास विनाकारण मारहाण केली. परिसरात रस्त्यावरून शिवीगाळ करत इतर व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे ४९ लाखांहून अधिक रुपयांची हानी !

जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे आतापर्यंत खासगी आणि सार्वजनिक संपत्तीची एकूण ४९ लाख ६२ सहस्र ८६० रुपयांची हानी झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुपोषित मुलांची समस्या कायम

जिल्ह्यात सद्य:स्थितीत ८९३ बालके अल्प वजनाची, तर ५९ बालके तीव्र अल्प वजनाची असल्याची माहिती जिल्हा परिषद महिला आणि बालविकास विभागाकडून देण्यात आली.

मूळच्या पुणे येथील महिलेची अमेरिकेतील ‘कौन्सिल मेंबर’ म्हणून निवड !

येथील ऋतुजा इंदापुरे यांना अमेरिकेतील समॅमिश शहराच्या ‘कौन्सिल मेंबर’ हा बहुमान मिळाला आहे. राष्ट्रीय बॅडमिंटनपटू असलेल्या इंदापुरे या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी असून त्यांचे पुढील शिक्षण आय.एल्.एस्. विधी महाविद्यालयात झाले. त्यांनी इंग्लंडमधून एल्.एल्.एम्. केले.

पुणे जिल्ह्यामध्ये मनमंदिरात भक्तीरूपी ज्योत प्रज्वलित करणारा गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

गुरुपौर्णिमा महोत्सवात समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी मान्यवरांचे विचार, ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता’ या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन झाले, तसेच ‘स्वरक्षण प्रात्यक्षिके’ हे विशेष आकर्षण ठरले.

मंत्रीपद मिळवून देण्यासाठी १०० कोटींची खंडणी मागणार्‍या चौघांना अटक !

राज्यातील मंत्रीमंडळात मंत्रीपद मिळवून देण्याचे आमीष दाखवून आमदाराकडे १०० कोटी रुपयांची मागणी करणार्‍या २ धर्मांधांसह ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

शास्त्रोक्त आणि कायदेशीर प्रक्रियेनंतरच देवीच्या मूर्ती संवर्धनाचे कार्य हाती !

उत्तर महाराष्ट्रातील भाविकांचे आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तश्रृंगी निवासिनी जगदंबेच्या मुख्य मंदिरातील मूर्ती संवर्धनाचे कार्य हे पूर्णतः कायदेशीर गोष्टी पार पाडून, शास्त्रोक्त पद्धतीने, तसेच पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसारच हाती घेण्यात आले आहे

कोरोना महामारीच्या काळात गणेशोत्सवावर घातलेले निर्बंध राज्यशासनाने हटवले !

कोरोना महामारीच्या काळातील निर्बंधांमुळे सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या होत्या; पण आता सण साजरे करण्यावरील निर्बंध मागे हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षी सर्वच सण धूमधडाक्यात साजरे होतील, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले.

दिघा येथील माजी नगरसेवक नवीन गवते आणि अपर्णा गवते यांचा भाजपमध्ये प्रवेश !

गणेश नाईक म्हणाले, ‘‘नवीन गवते यांना विशिष्ट परिस्थितीत पक्ष सोडवा लागला, तरी ते मनाने आमच्यासमवेत होते. गवते हे संदीप नाईक यांच्या संपर्कात होते. सरकारकडे पाठपुरावा करून आपण दिघा येथील प्रलंबित प्रश्न सोडवू.’’

पुणे येथील ‘महिला आयोग आपल्या दारी’च्या ‘जनसुनावणी’मध्ये १०४ महिलांच्या तक्रारी !

महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा, यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाच्या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ‘जनसुनावणी’ कार्यक्रमामध्ये १०४ महिलांनी तक्रारी नोंदवल्या.