कुंडल (जिल्हा सांगली) – जीवनात साधनेचे अनन्यसाधारण महत्त्व असून साधनेमुळेच आपण जीवनात स्थिर राहू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने नियमित साधनेचे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या साधिका श्रीमती अश्विनी जरंडीकर यांनी केले. ‘प्रतिनिधी हायस्कूल’ येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने १६ ऑगस्टला ‘किशोरी मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमात डॉ. (सौ.) सायली अतुल जरंडीकर यांनी ‘विद्यार्थिनींना आरोग्य चांगले रहाण्यासाठी घ्यावयाची काळजी’, याविषयी मार्गदर्शन केले. या प्रसंगी शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ. जयश्री पट्टणशेट्टी, सौ. सुवर्णा चिटणीस, विद्यार्थिनी, तसेच शाळेतील शिक्षक उपस्थित होते.