शेकडो कि.मी. अंतर चालत घरी जाणार्‍या मजुरांना साहाय्य करा ! – केंद्रशासनाचे राज्यशासनांना निर्देश

देशात दळणवळण बंदी झाल्यानंतर देशातील अनेक भागांमध्ये रोजंदारीवर काम करणारे मजूर शेकडो कि.मी. अंतर चालत जात त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे….

मशिदीत न जाता घरातच नमाज पठण करा ! – ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे आवाहन

‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने इतक्या उशिरा हे आवाहन का केले ?  दळणवळण बंदीचा नियम मोडून नमाजपठणासाठी जाणार्‍यांविषयी ते काही बोलत का नाहीत ? यावरून ‘देशात जे काही नियम सिद्ध केले जातात, ते केवळ हिंदूंसाठीच’, हेच सिद्ध होते !

विविध घटकांसाठी १ लाख ७० सहस्र कोटी रुपयांचे ‘पॅकेज’ घोषित

कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात दळणवळण बंदी करण्यात आली आहे. या बंदीचा गरीबांना फटका बसू नये, यासाठी केंद्र सरकारकडून ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने’च्या अंतर्गत १ लाख ७० सहस्र कोटी रुपयांच्या ‘पॅकेज’ देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी केली.

देशभरात १४ एप्रिलपर्यंत पथकर वसुलीला स्थगिती

देशभरात दळणवळण बंदी लागू असल्याने कारणाविना वाहनाने कुणालाही प्रवास करता येत नाही. या काळात अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने, तसेच वैद्यकीय कारणास्तव होणार्‍या वाहतुकीलाच अनुमती आहे.

भारतात १५ मेपर्यंत १३ लाख लोक कोरोनाबाधित होण्याची शक्यता

लोकहो, हा वेग रोखणे आपल्या सर्वांच्या हातात आहे, हे लक्षात घेऊन शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन प्रयत्न करूया !

देशात कोरोनाच्या मृतांची संख्या वाढणार नाही ! – डॉ. नरिंदर मेहरा, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद

रोग प्रतिकारशक्तीमध्ये भारताचा प्रथम क्रमांक आहे. त्यामुळे इतर देशांप्रमाणे भारतात कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या वाढणार नाही; पण हे सिद्ध करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे अतिशय आवश्यक आहे. देशात अल्प प्रमाणात मृत्यू होण्याची ३ कारणे असून यामध्ये शारीरिक अंतर, रोगप्रतिकार शक्ती आणि…

केंद्रशासनाकडून ‘अँटी मलेरिया’ (मलेरिया प्रतिबंधक) औषधावर निर्यातबंदी !

देशात कोरोनाचा सामना करण्यासाठी ‘हायड्रोक्सी क्लोरोक्वीन’ या ‘अँटी मलेरिया’ (मलेरिया प्रतिबंधक) औषधाची निर्यात बंद करण्यात आली आहे. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये हे औषध कोरोनाच्या विरोधात प्रभावी ठरत आहे.

तांब्याच्या वस्तूंवरील विषाणू काही मिनिटांतच नष्ट होतात ! – संशोधनाचा दावा

तांब्याच्या वस्तूंवर एखादा विषाणू असला, तर तो काही मिनिटांतच नष्ट होतो, असा दावा संशोधनातून करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज ‘जी-२०’ राष्ट्रांची आपत्कालीन परिषद, पंतप्रधान नरेंद्र मोदीही होणार सहभागी

कोरोनाच्या जागतिक महामहारीमुळे जगभरातील सर्वच देशांना त्याचा फटका बसला असून या संकटातून तोडगा काढण्यासाठी आज ‘जी-२०’ राष्ट्रांची आपत्कालीन परिषद आयोजित करण्यात आली आहे.

कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत २२ सहस्र ६५ जणांचा मृत्यू

कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत २१ सहस्र २९७ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ घंट्यांमध्ये अनुमाने २ सहस्र ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४ लाख ७२ सहस्र २९ झाली असून उपचार करून बरे झालेल्यांची संख्या १ लाख १४ सहस्र ७१३ इतकी आहे.