देहलीतील गोविंदपुरी पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक आणि ठाणा प्रमुख यांच्यात हाणामारी !

आपापसांत भांडणारे पोलीस समाजात कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?

‘ईडी’कडून देशभरात ३० ठिकाणी धाडी !

आम आदमी पक्षावर आरोप करत भाजपने ५ सप्टेंबर या दिवशी एका ‘स्टिंग ऑपरेशन’चा व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यामध्ये मद्य घोटाळ्यातील आरोपीचे वडील देहलीत मद्याचा परवाना घेतल्याचा दावा करतांना दिसत आहेत, तसेच त्यासाठी ‘कमिशन’ दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

तब्बल ५ सहस्र चारचाकी वाहने चोरणार्‍या अनिल चौहानला अटक !

‘चौहान याने पोलिसांशी संगनमत करून एवढ्या हत्या आणि असंख्य चोर्‍या केल्या का, याचे अन्वेषणही व्हायला हवे’, अशी मागणी कुणी केल्यास त्यात चूक ते काय ?

राजकीय पक्षांकडून होणार्‍या धार्मिक चिन्हे आणि नावे यांच्या वापरावर बंदीची मागणी

राजकीय पक्षांकडून धार्मिक चिन्हे आणि नावे यांच्या होणार्‍या वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सय्यद वसीम रिझवी यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे.

देहली येथून १ सहस्र २०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त : दोघा अफगाणी नागरिकांना अटक  

देहली पोलिसांच्या विशेष शाखेने दोघा अफगाणी नागरिकांना अटक करून त्यांच्याकडून ३१२.५ किलोग्राम मेथामफेटामाईन आणि १० किलोग्राम हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

देहलीतील ‘राजपथ’चे नाव आता ‘कर्तव्यपथ’ !

देहलीतील प्रसिद्ध ‘राजपथ’चे नाव पालटून त्याचे ‘कर्तव्यपथ’ असे नामकरण केले जाणार आहे. इंडिया गेटवरील नेताजींचा पुतळा ते राष्ट्रपती भवन हा रस्ता ‘राजपथ’ या नावाने ओळखला जातो.

भारतीय क्रिकेट खेळाडूला ‘खलिस्तानवादी’ म्हटल्यावरून ‘विकिपीडिया’ला भारत सरकारकडून नोटीस !

यात म्हटले आहे, ‘तुम्ही अर्शदीप सिंह याला खलिस्तानी संघटनांशी कसे काय जोडले ?’ माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एका उच्च स्तरीय समितीकडून विकिपीडियाच्या अधिकार्‍यांची चौकशी करण्यात येणार आहे. 

बिहारमध्ये सरकारी शाळेत ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; देहलीत तिसरीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

बिहार आणि देहली येथे सरकारी शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाच्या घटना समोर आल्या आहेत. बिहारच्या बेगुसरायमध्ये इयत्ता दुसरीच्या ७ वर्षांच्या मुलीवर शाळेतील सफाई कामगाराने बलात्कार केला.

ब्रिटनला मागे टाकत भारत जगातील ५ वी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था !

अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी यांच्यानंतर भारत आता जगातील ५ व्या क्रमांकाचा मोठ्या अर्थव्यवस्थेचा देश बनला आहे. भारताने ब्रिटनला मागे टाकून हा पल्ला गाठला आहे.

संस्कृत भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

मुळात जनतेला अशी मागणी करण्यास लागू नये. केंद्रातील भाजप सरकार याविषयी चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !