नवी देहली – आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमधील ४ सप्टेंबर या दिवशी झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यात भारताचा शीख धर्मीय खेळाडू अर्शदीप सिंह याच्याकडून एक झेल सुटला. त्यानंतर भारताचा पराभव झाला. या घटनेनंतर सामाजिक माध्यमांतून पाकिस्तानी नागरिकांनी अर्शदीप याला ‘खलिस्तानवादी’ असल्याचे सांगत अपप्रचार चालू केला. तसेच ‘विकीपीडिया’ या संकेतस्थळानेही त्याच्याविषयी अशीच माहिती प्रसारित केली.
IT Ministry summons Wikipedia executives, seeks explanation over vandalism of Arshdeep Singh’s page to add ‘Khalistani’ association https://t.co/eIkqbNTr3t
— OpIndia.com (@OpIndia_com) September 5, 2022
यामुळे भारताच्या ‘केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती औद्यौगिक मंत्रालया’ने यासंदर्भात विकिपीडियाला नोटीस बजावली आहे. यात म्हटले आहे, ‘तुम्ही अर्शदीप सिंह याला खलिस्तानी संघटनांशी कसे काय जोडले ?’ माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एका उच्च स्तरीय समितीकडून विकिपीडियाच्या अधिकार्यांची चौकशी करण्यात येणार आहे.