तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचे शवविच्छेदनातून उघड !

तरुणीच्या करण्यात आलेल्या शवविच्छेदनातून तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे समोर आले आहे. तरुणीच्या नातेवाइकांनी ती शेवटी विवस्त्र सापडल्याने या संदर्भात संशय व्यक्त केला होता.

मंत्र्यांच्या विधानांसाठी सरकार नाही, तर स्वतः मंत्रीच उत्तरदायी ! – सर्वाेच्च न्यायालय

कोणत्याही मंत्र्याच्या विधानासाठी सरकारला उत्तरदायी धरता येत नाही. यासाठी मंत्रीच उत्तरदायी असतात. यासंबंधी राज्यघटनेतील अनुच्छेद १९(२) मध्ये पूर्वीपासूनच योग्य ती तरतूद अस्तित्वात आहे, असे सांगत सर्वाेच्च न्यायालयाने लोकप्रतिनिधींच्या भाषणस्वातंत्र्यावर निर्बंध घालण्यास नकार दिला.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने ३ सैन्याधिकार्‍यांना लाचखोरीसाठी अटक केल्याचे वृत्त बनावट आणि दिशाभूल करणारे ! – सैन्यदल

अशी खोटी वृत्ते प्रसारित करून भारतीय सैन्याची प्रतिमा मलिन करणार्‍या वृत्तपत्रावर कारवाई करा !

६३३ भारतीय बंदीवानांना मुक्त करा !

भारताने पाकिस्तानला त्याच्या कारागृहातील शिक्षा पूर्ण झालेले भारतीय आणि ज्यांचे नागरिकत्व भारतीय असल्याची निश्‍चिती झाली आहे, अशांची मुक्तता करण्याचे आवाहन केले आहे.

देहलीमध्ये चारचाकी गाडीने तरुणीला धडक देऊन १२ किलोमीटर फरफरटत नेल्याने तिचा मृत्यू

कांझावाला भागात ३१ डिसेंबरच्या रात्री एका चारचाकी गाडीने दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरील तरुणी गाडीच्या खाली आली आणि तिला तसेच १२ किलोमीटर फरफटत नेण्यात आले.या अपघातात तिचा मृत्यू झाला.

नोटाबंदी वैध ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

वर्ष २०१६ मध्ये केंद्रशासनाने केलेली नोटाबंदी योग्यच होती, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या घटनापिठाने दिला. नोटाबंदीच्या विरोधात देशातून एकूण ५८ याचिका प्रविष्ट करण्यात आल्या होत्या.

‘ऑप इंडिया’ वृत्तसंकेतस्थळानुसार वर्षभरात ‘लव्ह जिहाद’च्या १५३ घटना !

देशात वर्ष २०२२ मध्ये ‘लव्ह जिहाद’च्या १५३ घटनांचे वार्तांकन ‘ऑप इंडिया’ या वृत्तसंकेतस्थळाने केले होते. लव्ह जिहादच्या घटना याहून अधिक असण्याची शक्यता आहे; कारण काही घटना समाजासमोर, पोलिसांसमोर येऊ शकलेल्या नाहीत. या घटनांमध्ये हिंदु मुली, तरुणी, महिला आणि तरुण बळी पडलेले आहेत.

इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने विद्यार्थ्यांपासून खरा इतिहास लपवला ! – डॉ. एस्.एल. भैरप्पा, ज्येष्ठ साहित्यिक

अभ्यासक्रमातून भारताचा विकृत इतिहास शिकवून काँग्रेसने युवा पिढीची मोठ्या प्रमाणात अपरिमित हानी केली. ती भरून काढण्यासाठी भाजप सरकार, भारतातील बुद्धीजीवी आणि विचारवंत यांना मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणे आवश्यक !

४२ दिवसांत बेपत्ता असणार्‍या २१ बेपत्ता मुलांना शोधून काढणार्‍या महिला पोलीस अधिकार्‍याचे सर्वत्र कौतुक !

यापूर्वीही देहली येथील समयपूर बदली पोलीस ठाण्यात मुख्य हवालदार म्हणून कार्यरत असतांना त्यांनी अडीच मासात ७६ बेपत्ता मुलांना शोधून काढले होते.

भारताचे चुकीचे मानचित्र प्रसारित केल्यावरून व्हॉट्सअ‍ॅपकडून क्षमायाचना

केवळ क्षमायाचना केल्याने संबंधितांना सोडून देऊ नये, तर गुन्हा नोंदवून संबंधितांना शिक्षा झाली, तर अन्य आस्थापनांना याचा वचक बसेल !