नायजेरियात चर्चमध्ये झालेल्या आक्रमणात ५० हून अधिक ख्रिस्ती ठार
बंदूकधारी आक्रमणकर्त्यांनी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आलेल्या ख्रिस्त्यांवर शस्त्रांद्वारे आक्रमण केले आणि त्यांच्यावर ग्रेनेड फेकले. यासह त्यांनी चर्चच्या इमारतीच्या बाहेर आणि आतील लोकांवर गोळ्या झाडल्या, अशी माहिती ओंडो राज्याचे पोलीस प्रवक्ते फनमिलायो इबुकुन ओदुनलामी यांनी दिली.