आफ्रिकेतील नायजर देशात जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणात १३७ जणांचा मृत्यू

नियामी (नायजर) – आफ्रिका खंडातील नायजर देशातील पश्‍चिम भागात जिहादी आतंकवाद्यांनी ३ घंटे केलेल्या गोळीबारात १३७ जणांचा मृत्यू झाला. आतंकवाद्यांनी अनेक घरांनाही आग लावली. हा भाग माली देशाच्या सीमेजवळ आहे. या आक्रमणाचे दायित्व कोणत्याही संघटनेने घेतलेले नाही. या भागात मागील काही वर्षांपासून आतंकवादी कारवाया मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. मागील काही दिवसांपूर्वीही जवळपास ६६ जणांची हत्या करण्यात आली होती.