४ विवाहांची अनुमती असल्याने युगांडाच्या गायकाला स्वीकारायचा आहे इस्लाम !

आफ्रिकी देशातील गायक वायक्लिफ तुगुमे उपाख्य यकी बेंडा

नवी देहली – युगांडा या आफ्रिकी देशातील लोकप्रिय गायक वायक्लिफ तुगुमे उपाख्य यकी बेंडा याला इस्लाम स्वीकारण्याची इच्छा आहे. उच्चशिक्षित असलेल्या तुगुमे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना आपली इच्छा व्यक्त केली. ‘इस्लाम धर्म’ तुम्हाला चार स्त्रियांशी विवाह करण्याची अनुमती देतो. त्यामुळे मला हा धर्म पुष्कळ आवडतो’, असे तुगुमे यांनी म्हटले. यकी बेंडा हे एका मुलाचे पिता आहेत. त्यांचे महिलांसमवेतचे संबंध सतत बिघडत असतात. त्यामुळेच ते इस्लाम धर्म स्वीकारण्याचा विचार करत आहेत.

संपादकीय भूमिका

सामाजिक स्वास्थ्याला बाधा पोचवणार्‍या अशा चालीरितींचा परिणाम किती होतो, हे समजण्यासाठी हे उदाहरण पुरेसे नाही का ?