भारताला इस्लामी देश करण्याचा प्रयत्न करणारे याकडे लक्ष देतील का ? – संपादक
खार्टुम (सुदान) – सुदानचे पंतप्रधान अब्दुल्ला हमडोक आणि ‘सुदान पीपल्स लिबरेशन मूव्हमेंट (उत्तर)’ या बंडखोर गटाचे नेते अब्देल-अजीझ अल-हिलू यांनी सुदानमधील इस्लामी राजवट संपवून तेथे लोकशाही राज्यव्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथे या दोघांनी याविषयीच्या निर्णयावर स्वाक्षरी केली. ‘सुदानला लोकशाही देश म्हणून घडवायचे आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाचे हक्क अबाधित राखले जातात. त्यामुळे राज्यघटना ‘धर्म आणि राज्य’ वेगळे करण्याच्या तत्त्वावर आधारित असली पाहिजे. अशा राज्यघटनेमध्ये स्वयंनिर्णयाच्या अधिकाराचा आदर केला जाईल’, असे या दोघांनी म्हटले आहे. गेल्या ३० वर्षांपासून सुदानमध्ये इस्लामी राजवट होती.