झाम्बियामध्ये येशू ख्रिस्ताच्या पुनर्जिविताच्या प्रसंगाची स्वतःवर पुनरावृत्ती करतांना पाद्य्राचा मृत्यू !

 नेहमी श्रद्धाळू हिंदूंना नावे ठेवणारे बुद्धीप्रामाण्यवादी याविषयी काही बोलणार का ? – संपादक

लुसाका (झाम्बिया) – येथे येशू ख्रिस्ताच्या पुनर्जिविताच्या प्रसंगाची स्वतःवर पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात २२ वर्षीय पाद्री जेम्स सकारा याचा मृत्यू झाला आहे. येशू ख्रिस्त यांना सुळावर टांगण्यात आल्यानंतर ३ दिवसांनी ते पुनर्जिवित झाले होते, अशी आख्यायिका आहे. झाम्बियामधील जियोन चर्चचे पाद्री सकारा यांनीही येशू ख्रिस्ताच्या या आख्यायिकेप्रमाणे स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या अनुयायांना आश्‍वस्त केले की, येशू ख्रिस्त यांच्याप्रमाणे तेही ३ दिवसांनी परत जिवंत होतील. त्यानंतर त्यांनी अनुयायांना त्यांना भूमीमध्ये पुरण्यास सांगितले. पाद्रीने दिलेल्या आदेशांचे पालन करतांना त्यांच्या ३ अनुयायांनी त्यांचे हात बांधले आणि त्यांना जिवंतपणे भूमीमध्ये पुरले. ३ दिवसांनी त्यांचे सहाय्यक आणि अनुयायी पाद्रीला बाहेर काढण्यासाठी आले. त्यांनी पाद्रीच्या निर्जीव शरिराला बाहेर काढले आणि काही आध्यात्मिक अनुष्ठान करण्याचा प्रयत्न केला. तथापि अनेक प्रयत्न करूनही पाद्री सकाराचे शरीर अचेतनच राहिले, ते जिवंत होऊ शकले नाहीत. पाद्रीच्या मृत्यूनंतर त्याला या कामासाठी साहाय्य करणार्‍या ३ अनुयायांपैकी एक जण पोलिसांच्या स्वाधीन झाला.