विरोधी गुणधर्माचे असूनही शरिरात गुण्यागोविंदाने राहणारे वात, पित्त आणि कफ

शरिरातील वात आणि कफ ‘शीत (थंड)’ गुणाचे, तर पित्त उष्ण (गरम) गुणाचे आहे. ‘एकमेकांच्या विरोधी गुणांचे हे वात, पित्त आणि कफ निरोगी शरिरात गुण्यागोविंदाने राहतात’, हीच तर भगवंताची लीला आहे.’

शरिराच्या कणाकणात सामावलेले वात, पित्त आणि कफ

शरिरातील ‘वारा’ म्हणजे ‘वात’, ‘सूर्य’ म्हणजे ‘पित्त’ आणि ‘चंद्र’ म्हणजे ‘कफ’. हे वात, पित्त आणि कफ शरिरात ‘सर्वत्र’, म्हणजे प्रत्येक कणाकणात असतात. सर्व शरीरभर असणार्‍या वात, पित्त आणि कफ या तिघा जणांनाच संतुलित ठेवले, तर १०० वर्षे निरोगी रहाता येते.

भूक न लागणे (Loss of Appetite) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

पावलोपावली उपयोगी पडणारा आयुर्वेद !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या प्रेरणेने चालू झालेल्या या लेखमालिकेतून अगदी बाळबोध भाषेत सर्वांना समजेल, अशा सोप्या पद्धतीने आयुर्वेद आपल्यासमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे. प्रतिदिन या लेखांचा अभ्यास करा आणि ते आचरणात आणून साधनेसाठी उत्तम आरोग्य मिळवा !’

आतापर्यंत चुकीचे शिकलेले विसरा !

‘एकदा एक मुलगा एका गायन शिकवणार्‍या गुरुजींकडे गेला. त्‍याने गुरुजींना विचारले, ‘‘गुरुजी, मी किती दिवसांत चांगले गायन शिकू शकेन ?’’ गुरुजी म्‍हणाले, ‘‘आधीचे चुकीचे शिकलेले विसरायला जेवढे दिवस लागतील..

अती मात्रेत जेवण टाळा !

‘अती मात्रेत जेवल्‍याने वात, पित्त आणि कफ हे तिघेही बिघडतात. हे अनेक रोगांचे कारण ठरू शकते. त्‍यामुळेच आरोग्‍य राखण्‍यासाठी अती प्रमाणात जेवणे टाळायला हवे.’

डोकेदुखी नेमकी कशाने होते ?

आज आपण डोकेदुखीची कारणे कोणकोणती असू शकतात ? ते समजून घेणार आहोत. यामुळे आपली डोकेदुखी नेमकी कशामुळे आहे, हे स्‍वतःचे स्‍वतःला अभ्‍यासता येईल. त्‍यामुळे लगेच डोकेदुखीची गोळी न घेता त्‍याच्‍या मुळाशी जाऊन उपाययोजना करण्‍याचे प्रयत्न होतील.

Diwali : आयुर्वेदाच्‍या स्‍मृतीतून पदार्थाच्‍या निर्मितीमागे असलेले पंचमहाभूतांचे शास्‍त्र !

आपण दिवाळीमध्‍ये बनवत असलेल्‍या प्रत्‍येक फराळाच्‍या निर्मितीमागे पंचमहाभूतांचे शास्‍त्र दडलेले असते. कसे ते या लेखाद्वारे पाहूया . . .

चला ! सोप्‍या भाषेत आयुर्वेद शिकूया !

पोळी बनवण्‍यासारखे लहानसे काम असो किंवा १०० वर्षांचे आयुष्‍य असो, ‘संतुलन’ महत्त्वाचे ! एकदा का वात, पित्त आणि कफ समजले की, आयुर्वेद समजला ! आयुर्वेद एवढा सोपा आहे.

तापामध्‍ये काही वेळेला भूक खूप लागते. अशा वेळी ‘पचनशक्‍ती चांगली आहे’, असे समजावे का ?

‘काहींना ताप आलेला असतांनाही पुष्‍कळ भूक लागते. अशा वेळी ‘भूक चांगली लागली, म्‍हणजे आपला अग्‍नी (पचनशक्‍ती) चांगला आहे’, असे समजू नये. अग्‍नी मंद असतांनासुद्धा भूक लागू शकते. हे कसे, ते समजण्‍यासाठी एक व्‍यावहारिक उदाहरण पाहू…..