शरिराच्या कणाकणात सामावलेले वात, पित्त आणि कफ

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २५६

‘पृथ्वीवर वारा, सूर्य आणि चंद्र कुठे कुठे आहेत ? असे तुम्हाला विचारले, तर तुम्ही काय सांगाल ? ‘सर्वत्र.’ आपले शरीरही या पृथ्वीची लहानशी प्रतिकृतीच आहे म्हणा ना ! शरिरातील ‘वारा’ म्हणजे ‘वात’, ‘सूर्य’ म्हणजे ‘पित्त’ आणि ‘चंद्र’ म्हणजे ‘कफ’. हे वात, पित्त आणि कफ शरिरात ‘सर्वत्र’, म्हणजे प्रत्येक कणाकणात असतात.

वैद्य मेघराज पराडकर

आता तुम्ही विचाराल की, या ज्ञानाचा आपल्याला उपयोग काय ? अहो, उत्तर अगदी सोपे आहे. सर्व शरीरभर असणार्‍या वात, पित्त आणि कफ या तिघा जणांनाच संतुलित ठेवले, तर १०० वर्षे निरोगी रहाता येते. त्यामुळे वात, पित्त आणि कफ या तिघांचाच अभ्यास पुरेसा आहे आणि तोच आपण पुढील काही भागांत करणार आहोत.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.११.२०२३)


या मालिकेतील आतापर्यंतचे सर्व लेख एकत्र वाचण्‍यासाठी bit.ly/ayusanatan या लिंकला भेट द्या