आतापर्यंत चुकीचे शिकलेले विसरा !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २५४

‘एकदा एक मुलगा एका गायन शिकवणार्‍या गुरुजींकडे गेला. त्‍याने गुरुजींना विचारले, ‘‘गुरुजी, मी किती दिवसांत चांगले गायन शिकू शकेन ?’’ गुरुजी म्‍हणाले, ‘‘आधीचे चुकीचे शिकलेले विसरायला जेवढे दिवस लागतील, तेवढे दिवस !’’ आयुर्वेद शिक्षणाच्‍या संदर्भातही अगदी असेच आहे. सामाजिक प्रसारमाध्‍यमांतून ‘आयुर्वेद’ या नावाखाली जे जे चुकीचे पसरवले गेले आहे, ते ते सर्व डोक्‍यातून काढून टाकले, तरच ही लेखमालिका तुम्‍हाला दैनंदिन जीवनात आचरणात आणता येईल. त्‍यासाठी आपले डोकेरूपी ‘भांडे’ पूर्ण रिकामे करून, म्‍हणजेच वात, पित्त आणि कफ यांच्‍याविषयीच्‍या आधीच्‍या संकल्‍पना बाजूला ठेवून ही लेखमालिका अभ्‍यासा. आयुर्वेदाचे योग्‍य ज्ञान ग्रहण केल्‍यावर तुम्‍ही निश्‍चितच आरोग्‍य मिळवू शकाल, यात मला तिळमात्रही शंका नाही !’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.११.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्‍यासाठी मार्गिका

bit.ly/ayusanatan