
१. संतांवर लोक प्रेम करतात; कारण त्यांचे देह प्रेममय असतात. संतांचे देह मऊ लुसलुशीत असतात; कारण त्यांच्या मनाची मृदुता पराकोटीची असते.
२. वेदांतावर चर्चा करता आली, ‘वेद जाणला’, असे वाटले, तरी देहबुद्धीचा अभिमान धरू नये; कारण वेद ही ईश्वराचीच निर्मिती आहे आणि जाणवून देण्याची प्रक्रियाही ईश्वरच करतो.
३. वेदांत, तत्त्वज्ञान, ज्ञान-विज्ञान, ऐहिक आणि पारलौकिक, या सर्वांचाच उदय सर्वगत चैतन्यातून असल्यामुळे या सर्व गोष्टी, म्हणजे चैतन्यप्रवाहावरील बुडबुडे होत.
– प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (‘गुरुबोध’)