जे मुळात चांगले असते तेच पुन्हा प्रयत्नाने चांगले करण्याने स्वच्छ होते. मन हे मुळात सत्त्वगुणी असल्याने ‘सज्जनपणा’ हाच त्याचा स्वभाव आहे. ते संस्काराने रजोगुणी, तमोगुणी होते आणि जन्मजन्मांच्या आवर्तनांतून पुन:पुन्हा तेच रजोगुणादि संस्कार दृढावत् जातात अन् मग जणू मनाचा तोच स्वभाव आहे, असे वाटू लागते. यासाठी समर्थ जणू मनाला ‘सज्जना’ म्हणून त्याच्या मूळ स्वरूपाची ओळख करून देत आहेत.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘मनोबोध’)