विषयाची आवड न्यून झाल्याविना भगवंताची आवड निर्माण होणारच नाही. त्याग आणि भोग एकाच वेळी कसे येतील ? नाम घेतले आणि चिंता, दुःख दूर झाले नाही, याचा अर्थ नाम घेतलेच नाही. श्रवणाचे रूपांतर नामाविषयी प्रेम निर्माण होण्यात व्हावे. माणसाला श्रवण वर्ज्य वाटते; कारण त्याला स्वतःचे काहीच सोडायचे नसते. सत्पुरुषांजवळ बसून चार शब्द ऐकावेसे वाटले पाहिजे, ही पहिली परीक्षा ! वागण्यात खरा पालट होणे, हा खरा सत्संग. पालट झाला नाही, तर सत्संग घडलाच नाही. आम्ही संतांना केवळ सल्ला विचारतो आणि वागतांना वागायचे तसे वागतो. ही स्वतःचीच फसवणूक असते.
– वि.श्री. काकडे
(साभार : ग्रंथ ‘चिंतन’)