१. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची शिकवण

‘५.२.२०२५ या दिवशी एक साधक मला म्हणाला, ‘‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी नामाचे महत्त्व पुढील ओवीद्वारे सुंदर पद्धतीने सांगितले आहे.
‘फुटो हे मस्तक तुटो हें शरीर । नामाचा गजर सोडूं नये ।।’ (तुकाराम गाथा, अभंग ४३१५, ओवी २) म्हणजे ‘कितीही संकटे आली, तरी भगवंताचे नाम घेणे सोडू नये.’
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण

त्याचे बोलणे ऐकताच ईश्वराने मला पुढील विचार दिला आणि मी त्या साधकाला म्हणालो, ‘‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या काळात वातावरण सात्त्विक होते आणि लोकही सात्त्विक होते. त्यामुळे तुकाराम महाराजांनी लोकांना वरील ओवीद्वारे ‘काही झाले, तरी नाम सोडू नये’, असे सांगितले. आता वातावरणातील रज-तम वाढले आहे आणि व्यक्तीतील स्वभावदोष अन् अहं यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टर साधकांना सांगतात,

‘फुटो हे मस्तक तुटो हे शरीर । प्रक्रियेतील (टीप) सातत्य सोडू नये ।’
टीप : स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याची प्रक्रिया
स्वभावदोष आणि अहं यांचे अडथळे पुष्कळ असल्याने साधकाला अखंड नामजप करता येत नाही. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना प्राधान्याने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करायला सांगितले आहेत. त्यानंतर साधकाचा अखंड नामजप सुलभतेने होणार आहे.’’
तेव्हा माझ्या मनात ‘संत तुकाराम महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काळानुरूप मार्गदर्शन केले आहे’, असा विचार आला.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.२.२०२५)