‘गुरुदेवांसाठी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासाठी) माझे मन व्याकुळ झाले. माझ्या मनाला त्यांना स्थुलातून भेटण्याची ओढ लागली; पण दुसर्या क्षणी वाटले की, आतापर्यंत अनेकदा भेटूनही माझे स्वभावदोष अन् अहं यांच्या तीव्रतेमुळे माझ्यात भाव नव्हता. त्यामुळे देव समोर असूनही मी त्याच्या भक्तीत न डुंबता कोरडी राहिले. याची माझ्या मनाला खंत जाणवू लागली आणि माझ्याकडून त्यांना पुढीलप्रमाणे काव्यातून आत्मनिवेदन झाले.

तुझ्याविना जगण्याची देवा (टीप १), कल्पनाही करवत नाही ।
तुझ्याविना जगण्याचा क्षणही नसावा या जीवनी ।।
प्रत्येक श्वास अन् हृदयाच्या ठोक्यागणिक ।
‘केवळ तुझाच ध्यास जिवा लागावा’, हीच मागणी ।। १ ।।

स्थुलातून लागली तुझ्या दर्शनाची आस ।
परी वाटते माझ्या मनास ।
जेव्हा असेल तुझाच अंतरी वास (टीप १) ।
तेव्हाच मज तू भेटावास ।। २ ।।
क्षणोक्षणी, पदोपदी अनुभवावे तुजला देवा, हाच लागावा ध्यास ।
हे गुरुदेवा, पुरवाल ना माझा हा अट्टाहास ।। ३ ।।
क्षमा करावी गुरुदेवा, ही स्वेच्छा मी मनी धरली ।
होऊ द्या या माझ्या स्वेच्छेचा नाश ।।
तोडुनी स्वभावदोष अन् अहं यांचा पाश ।
होऊ द्या तुमच्याशी एकरूप माझा प्रत्येक श्वास ।। ४ ।।
टीप १ : ‘मी अखंड भावावस्थेत असतांनाच मला तुम्ही भेटावे’, असे मला वाटते.
– कु. कौमुदी जेवळीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.११.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |