|

मुंबई – मालेगाव जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी १०० घुसखोर अर्जदारांनी कोणतेही प्रमाणपत्र सादर न करता जन्म प्रमाणपत्र मिळवले आहे. ही सूची भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवली, तसेच या प्रकरणाचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथकाकडे देऊन घुसखोरांना लगेचच त्यांच्या देशात परत पाठवून देण्याची मागणी केली आहे.
१. भारतात जन्म झाल्याचे कोणतेही प्रमाणपत्र किंवा कागदपत्र नसतांना मालेगाव येथील १०० घुसखोर अर्जदारांनी जन्म प्रमाणपत्र मिळवले.
२. यातील काही अर्जांसोबत फक्त आधारकार्ड आहे, तर काही अर्जांसोबत आधारकार्ड आणि शिधापत्रिका यांची छायांकित प्रत जोडण्यात आली आहे; परंतु शिधापत्रिका म्हणजे केवळ धान्य मिळवण्याचे टोकन असून त्याला कोणत्याही प्रकारचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. आधारकार्ड म्हणजे केवळ व्यक्तीची ओळख देणारा क्रमांक असून त्याला महत्त्वाच्या कामांसाठी पुरावा म्हणून धरता येणार नाही, असे यापूर्वीच राज्य सरकारने स्पष्ट केले असल्याचे किरीट सोमय्या यांनी पत्रात सांगितले.
३. १०० अर्जदारांकडे भारतीयत्वाचा कोणताही पुरावा नसतांना तहसीलदारांनी त्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले. हा मोठा गुन्हा आहे. त्यामुळे तहसीलदार कार्यालयातील ज्या अधिकार्यांनी या अर्जाला मान्यता दिली, त्यांच्यावर कारवाई करावी. या १०० लोकांपैकी ज्यांच्याकडे भारतीय असल्याचा कोणताही पुरावा नाही, त्यांची विचारपूस करून कारवाई करावी. हे १०० लोकांचे प्रकरण आतंकवादविरोधी पथकाकडे सोपवावे.