भारताचा रशिया आणि अमेरिका यांच्‍याविषयीचा धाडसी निर्णय !

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

जगात रशियाला अत्‍यंत संवेदनशील तंत्रज्ञान पुरवणारा भारत हा जगातील सर्वांत मोठा दुसर्‍या क्रमांकाचा देश बनला आहे. चीन नंतर भारत रशियाला ‘मायक्रोचिप्‍स’, ‘सर्किट्‍स’ आणि ‘मशीन टूल्‍स’ (यंत्रसामुग्री) यांचा सर्वाधिक पुरवठा करतो. वर्ष २०२४ मध्‍ये भारताने ९५ दशलक्ष डॉलरचे (८२५ कोटी रुपयांचे) तंत्रज्ञान रशियाला दिले आहे. रशियावर विशेष म्‍हणजे रशिया-युक्रेन युद्ध चालू असतांना अमेरिका आणि युरोप यांनी आर्थिक निर्बंध घातलेले असतांना भारताने हे पाऊल उचलले. यातून एकीकडे भारत-रशिया मैत्रीची घनता, तर दुसरीकडे अमेरिकेच्‍या निर्बंधांना आपण दाखवलेली केराची टोपली दिसून येते.

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्‍ट्र धोरण विश्‍लेषक, पुणे. (१८.२.२०२५)