
योगेश्वर भगवान गोपालकृष्ण यांचा परमशत्रू ज्याला भीमाने मल्ल युद्धात ठार मारले होते, दुष्ट दुराचारी कंसाचा सासरा, १०० राजांचा बळी देण्याची सिद्धता करणारा अत्यंत क्रौर्याने वागणारा असा जरासंध ! ज्याच्या मृत्यूनंतर त्याचा पांडवांनी जप्त केलेला मुकुट राजा परिक्षिताने घातला आणि त्याची बुद्धी पालटली अन् ऋषींचा अपमान घडला गेला, तसेच ‘परिक्षिताला सर्पापासून मृत्यू येईल’, असा शाप मिळाला. त्या जरासंधाचे उदात्तीकरण सहज जाता जाता नितीश कुमार (बिहारचे मुख्यमंत्री) भाजपसमवेत असतांना करत आहेत. (बिहारमध्ये नुकतेच जरासंधाचे स्मारक उभारण्यात आले आहे.)
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. (१३.३.२०२५)