दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे ज्ञानात भर पडते ! – अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर, मुंबई उच्च न्यायालय

अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आध्यात्मिकदृष्ट्या सर्व प्रकारचे आचार-विचार वाचावयास मिळतात. हिंदु धर्म, आयुर्वेद, राष्ट्र-धर्म, अध्यात्म आदी अनेक विषयांवर तज्ञ आणि जाणकार मंडळी यांचे लेख वाचून ज्ञानात भर पडते. सण-उत्सव कसे साजरे करावेत, त्यांमागील अध्यात्मशास्त्र, त्याचा होणारा लाभ आदी विषय दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये वाचायला मिळतात.