‘स्‍वयंसूचनांद्वारे आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय होतात’, असे परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकाला सांगणे आणि प्रत्यक्‍षातही साधकाला त्याची प्रचीती येणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘एकदा परात्‍पर गुरु डॉ. आठवले मला म्‍हणाले, ‘‘स्‍वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी मनाला देण्यात येणार्‍या स्वयंसूचनाद्वारे आध्यात्मिक स्तरावरील उपाय होतात. त्यासाठी लागणारा वेळ तू आध्यात्‍मिक उपायांमध्ये मोजत जा.’’ तेव्हा माझ्या मनात प्रश्न आला, ‘स्वयंसूचना या मानसिक स्तरावरील असतात.

श्री. राम होनप

यातून आध्यात्मिक स्‍तरावरील उपाय कसे होतील ?’ यानंतर मी प्रतिदिन स्वयंसूचनांची सत्रे करू लागलो. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मी आध्यात्मिक त्रास न्यून होण्‍यासाठी नामजप करतांना मला कधीकधी माझ्या शरिरात ईश्वरी संवेदना जाणवतात, तशा ईश्वरी संवेदना मला स्वयंसूचना देतांनाही जाणवत आहेत.’

याप्रसंगी मला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या वरील वाक्‍याची अनुभूती आली आणि माझी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. ‘स्वयंसूचनांद्वारे साधकांवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय कसे होतात ?’, याची देवाच्या कृपेमुळे माझ्या लक्षात आलेली कारणे पुढे दिली आहेत.

१. ‘स्‍वयंसूचनांद्वारे साधकांचे स्‍वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन लवकर व्‍हावे’, हा परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा संकल्‍प कार्यरत आहे.

२. साधक ‘ईश्‍वरप्राप्‍तीतील स्‍वभावदोषांचे अडथळे दूर व्‍हावेत’, यासाठी स्‍वयंसूचना देतात. त्‍यामुळे त्‍यांना ईश्‍वराचा आशीर्वादही प्राप्‍त होतो.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१२.२०२४