संपादकीय : कायदा होईलही; पण ?  

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

गेली दीड सहस्र वर्षे महाराष्‍ट्रासह भारतात चालू असलेल्‍या ‘लव्‍ह जिहाद’च्‍या प्रकरणांमध्‍ये कुठेतरी शिक्षा होऊ शकेल, असा कायदा महाराष्‍ट्रात होऊ घातला आहे. त्‍यासाठी ७ सदस्‍यांची समिती स्‍थापन करून महायुतीच्‍या राज्‍य सरकारने एक सकारात्‍मक पाऊल अंतिमतः उचलले आहे. सरकार स्थापन झाल्याच्या काही दिवसांतच हे वृत्त ऐकायला मिळाल्याने भाजपला मत दिल्याचे हिंदुत्वनिष्ठ मतदारांना काही अंशी समाधान नक्कीच झाले असेल. खरेतर हिमाचल प्रदेशासारख्या छोट्या राज्यातही या संदर्भातील कायदा आहे. आपल्या प्रगत राज्यातही गेली काही वर्षे हिंदुत्वनिष्‍ठ पक्षांचे शासन आहे; तुलनेत हा कायदा विलंबानेच होत आहे. ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नाही’ म्हणणार्‍यांना ही मोठी चपराक आहे. आदिवासी मुलींना खोट्या प्रेमात फसवून त्यांचे धर्मांतर करून त्यांच्या भूमी लाटण्याचेही षड्यंत्र आता उघड झाले आहे. अशा प्रकरणांना निर्बंध घालण्यासाठी या कायद्याचा मोठा लाभ होणार आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे अशा २६८ प्रकरणांच्या तक्रारी आहेत.

समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी ‘या संदर्भातील एकाही प्रकरणी तक्रार नाही’, असे अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांच्यावर सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींनी खरेतर वैचारिक हल्लाबोल चढवला पाहिजे. लव्ह जिहादच्या प्रकरणांची गणती ठेवणेही कठीण आहे, अशी प्रत्यक्ष स्थिती असतांना अशा प्रकारची विधाने करणे हा प्रत्येक हिंदूचा घोर अवमान आहे. केरळच्या न्यायालयाने या संदर्भात सांगितले आहे. कितीतरी पोलिसांनी तक्रारी प्रविष्ट करून घेतल्या नसतील, कितीतरी पीडित मुलींनी किंवा कुटुंबांनी लोकलज्जेस्‍तव तक्रारी केल्या नसतील, तरीही आज बहुतांश छोट्या गावांतील पोलीस ठाण्यांतही हिंदु मुलीची किंवा विवाहितेची मुसलमानाने फसवणूक केल्याच्या तक्‍रारी पोलीस ठाण्यात प्‍रविष्ट झालेल्या आहेत. त्याचे प्‍रथमदर्शनी अहवालही पत्रकारांना मिळाले आहेत. मुली सज्ञान असल्यामुळे पोलीसही हतबल असल्याचे अनेक प्रकरणांत लक्षात आले आहे. पीडित मुलींनी त्यांच्या द़ुर्दैवी कहाण्यांचे व्हिडिओ केले आहेत, इतकेच नाही, तर पत्रकार परिषदाही घेतल्या आहेत. ‘लव्ह जिहाद’ शब्‍द़ाचा शोध भारतियांनी लावलेला नाही, तर इंग्लडमधील पोलीस अधिकार्‍यांना जिहाद्‍यांचे हे षड्यंत्र लक्षात आले आहे, हे सर्व प्रसारमाध्यमांचे पत्रकार रईस शेख यांना सांगत का नाहीत ?

लव्‍ह जिहादच्‍या प्रशिक्षणाचे मूळ !

देहलीमध्‍ये नुकतेच इयत्ता ९ वीत शिकणार्‍या एका विद्यार्थिनीने हिंदु नाव घेऊन मुलींची फसवणूक करणार्‍या महंमद समद या ‘लव्‍ह जिहाद्या’ला पकडून देऊन एक मोठे षड्‌यंत्र पुन्‍हा उघड केले आहे. महंमद समद याने देहलीच्‍या मशिदीमध्‍ये पैसे आणि प्रशिक्षण दिले गेल्याची स्वीकृती दिली. एकाच वेळी १८४ जणांना प्रशिक्षण दिल्याचेही त्याने सांगितले. अनेक मशिदींमधून मुलींना फसवण्यासाठी मंतरलेले गंडेदोरे आणि अंगारा दिला जात असल्याचे पकडलेल्या लव्ह जिहाद्यांनी स्वीकारले आहे. जोपर्यंत गंडेदारे अंगावरून निघत नाहीत, तोपर्यंत मुली लव्ह जिहाद्यांकडेच रहायचा हट्ट धरतात आणि कुटुंबियांनाही जुमानत नाहीत, हेही लक्षात आले आहे. महाविद्यालयाबाहेर हिंदु मुलींना आकर्षित करण्यासाठी पैसे आणि गाड्या अन् भारतातील जातीनिहाय मुली फसवल्यास त्यानुसार मिळणार्‍या पैशांच्या आकडेवारीचे पत्रक हे सारे युवकांना मशिदीतून मिळत असल्याची स्वीकृती त्‍यांनी दिली आहे. इतकेच काय मुलींना फसवल्यावर त्यांना काही वेळा मशिदीतही आश्रय दिल्याचे उघड झाले आहे. मुळावर आघात झाला, तर भारतात लव्ह जिहाद राबवण्‍यासाठी जे कुणी पैसा पुरवतात, त्यांच्याही नाड्‍या आवळणे सरकारला सोपे जाईल.

लव्‍ह जिहादची व्‍याप्‍ती 

‘लव्‍ह जिहाद’ करण्‍यामागे धर्मांतर हा तर हेतू आहेच; परंतु केवळ धर्मांतर नव्‍हे, तर ज्‍या ज्‍या प्रकारे शक्‍य होईल, त्‍या माध्‍यमातून हिंदूंच्‍या मुलींना फसवून हिंदूंचा वंशविच्‍छेद करण्‍याचे धर्मांधांचे लक्ष्य आहे. त्यामुळेच धर्मांतर करून लव्ह जिहाद  करायचा हा एक भाग आहे. छेडछाड, लैंगिक फसवणूक, लैंगिक आणि शारीरिक छळ; कुटुंबियांना होणारा मानसिक त्रास, पैसे-दागिने चोरणे, मुलीला धमकावणे, अपहरण, अश्लील छायाचित्रे काढणे, अन्यांकडून लैंगिक अत्याचार, गोमांस खाण्याची आणि बुरखा घालण्याची बळजोरी; हत्या, आत्महत्या अशा एक ना अनेक अत्याचारांची व्याप्ती असतांना यात कुठे धर्मांतराचा दुरान्वयानेही संबंध आलेला नसतो. सध्या सर्‍व राज्यांत अस्तित्वात असलेला कायदा हा प्रामुख्याने ‘फसवून केलेल्या धर्‍मांतराच्या विरोधातील’ कायदा असल्याने या सर्व वंशविच्छेदाच्‍या षड्‍यंत्राला, म्हणजेच ‘जिहाद’च्या अत्‍याचारांना कशाच्या अंतर्गत बसवून शिक्षा करणार ? गुन्हेगारी, फसवणूक, अत्याचार, बलात्कार यांची काही कलमे त्याला लागतीलही; परंतु या सर्व गोष्टी ज्या हेतूने केल्या जातात, तो वंशविच्छेदी ‘लव्ह जिहाद’ मुळातून बंद होण्यासाठी लव्ह जिहाद़च्या वरील कुठल्याही प्‍रयत्नाला प्रतिबंध करणारा, लागू होणारा कठोरात कठोर कायदा होणे आवश्यक आहे. दुकानात व्हिडिओ काढणारे, मेंदी काढणारे, महाविद्यालयाबाहेर फिरणारे, भ्रमणभाषचे दुकानदार आदी सर्व लव्ह जिहादी धर्मांधांना त्या अंतर्गत घेणे आवश्यक आहे.

राज्‍यघटनेत सुधारणा करणे आवश्‍यक 

‘लव्‍ह जिहाद’ अस्‍तित्‍वात आहे, हे मान्‍य करून थेट त्‍याच्‍या विरोधात कायदा करण्‍यासाठी राज्‍यघटनेत आवश्यक प्रावधान नाही. आता असा कायदा करण्याचा प्रयत्न झाला, तर हिंदुविरोधी सर्वोच्च न्‍यायालयात जाऊ शकतात आणि तिथे काही वेगळेही होऊ शकते. भाजपला बहुमत मिळूनही सध्या ‘थेट लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यासारखी स्थिती नाही’, हे सरकार जाणून आहे; परंतु हळूहळू ती स्थितीही आणावी लागेल. राज्यघटनेत आतापर्यंत १०४ वेळा सुधारणा झाल्या. त्यामुळे आवश्यक त्या सुधारणा करून लव्ह जिहादची सर्व व्याप्ती सामावली जाईल, असा अतिशय सशक्त कायदाही येत्या काळात येईल, याची प्रत्येक हिंद़ुत्वनिष्ठ वाट बघेल. या सर्व गोष्टी हिंदु राष्ट्र आल्याविना शक्‍य नाहीत, हेही तितकेच सत्य आहे. गोवंश हत्याबंदीचा कायदा आहे; परंतु अद्याप गोवंशियांच्या हत्यांचे प्रमाण अल्प झालेले नाही. यावरून कायद्याची प्रभावी कार्यवाही किती आवश्यक असते, हे लक्षात येते. ‘हिंदु राष्ट्र’ या शब्द़ांच्या केवळ धाकानेही धर्मांधांकडून होणारे गुन्हे न्यून होतील, यासाठी हिंदु राष्ट्राची मागणी लावून धरण्यास पर्याय रहात नाही !

संभाव्‍य लव्‍ह जिहादविरोधी कायद्याच्‍या अंतर्गत गुन्‍हेगारांना कठोर शिक्षा होण्‍यासाठी हिंदूंनी मोठ्या संख्‍येने पुढे यावे !