कुर्टी ते आपेव्हाळ रस्त्याच्या कामाची धारिका गहाळ ! – कृषीमंत्री रवि नाईक यांचा गौप्यस्फोट

प्रतिकात्मक चित्र

फोंडा, १९ एप्रिल (वार्ता.) – कुर्टी ते आपेव्हाळ येथील रस्त्याच्या कामाची धारिका सार्वजनिक बांधकाम खात्यात देण्यात आली होती. ही धारिक गेल्या ५ मासांपासून गहाळ झाली आहे. खात्यामध्ये कुणीतरी धारिका लपवून ठेवून लोकांच्या कामांमध्ये अडथळा आणत आहे, असा गौप्यस्फोट फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवि नाईक यांनी केला. फोंडा येथे रस्त्याच्या डांबरीकरणाच्या शुभारंभप्रसंगी कृषीमंत्री नाईक बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष आनंद नाईक आदींची उपस्थिती होती.

मंत्री नाईक पुढे म्हणाले, ‘‘रस्त्याच्या कामाची धारिका गहाळ झाली नसती, तर रस्त्याचे काम पावसाळ्याच्या पूर्वी वेळेवर झाले असते. धारिका गहाळ कशी झाली याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. फोंडा येथील विविध भागांत सुमारे ३ कोटी ७० लक्ष रुपये खूर्चन डांबरीकरणाचे काम चालू आहे.’’