‘गुरुदेवांना अंतःकरणात अनुभवता येण्यासाठी प्रार्थना करतांना ‘त्यांना कशा प्रकारे हाक मारू, म्हणजे ते येतील आणि दर्शन देतील’, असा विचार माझ्या मनात आला. याविषयी चिंतन करतांना मला सुचलेल्या ओळी पुढे दिल्या आहेत.

गुरुनाथा आपले चरण आहेत दिव्य ।
ब्रह्मांड सारे व्यापून उरले आहेत भव्य ॥
दर्शनाने तव सुचे मज काव्य ।
गुरुनाथा आपले चरण आहेत दिव्य ॥
मन माझे घेई गुरुचरणांकडे धाव ।
जणू नदी मिळे सागराला तैसा माझा भाव ॥
_____________________________________________

एकची देवा माझे मागणे ।
का हो देवा रुसलात मजवरी ।
यावे वेगे माझ्या अंतरी ।
क्षणभर भेट द्यावी ।
कृपा इतकीच करावी ॥
तुम्हाविण अंतरी वाटे सुने सुने ।
गाऊ मी कोणाचे गाणे ।
एकची देवा माझे मागणे ।
गोड रूप तुझे नित्य पहाणे ॥
________________________________________________
भगवंताच्या भ्रमंतीचा दिव्य मार्ग तो ।
गुरुदेव पूर्वी ज्या मार्गावरून गेले होते, तो मार्ग पहातांना मला सुंदर दृश्य दिसले आणि त्या वेळी पुढील ओळी सुचल्या.
भगवंताच्या भ्रमंतीचा दिव्य मार्ग तो ।
आम्ही नित्य पहातो ।
मार्गावरील सजीव-निर्जीव म्हणती ।
कोमल चरणस्पर्श तो आम्ही सदा अनुभवतो ॥ १ ॥
दृष्टी त्यांची आमच्यावर फिरता क्षणभर ।
वाटते जीवन आमचे झाले सफल ।
जीवनाच्या कोड्याची क्षणात् होते उकल ।
आनंदी होती नर-नारी सकल ॥ २ ॥
– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(२७.७.२०२३)