भारताची शस्‍त्रास्‍त्रांच्‍या निर्यातीत भरारी !

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

स्‍वतंत्र भारताच्‍या इतिहासात पहिल्‍यांदाच असे घडले आहे की, भारत हा रशिया, फ्रान्‍स, इस्रायल आणि अमेरिका यांच्याकडून शस्त्‍रास्त्‍रे आयात करत आला; पण आता हाच भारत युरोपला संरक्षणसामुग्री पुरवत आहे. हे घडले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच पार पडलेल्या फ्रान्स दौर्‍यात ! फ्रान्स भारताकडून विकत घेणार ‘पिनाका मल्टी बॅरेल रॉकेट लाँचर्स’ ! या लाँचर्सचा विकास भारताच्या ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने केला आहे. पश्चिम युरोपियन देश भारताकडून शस्त्रास्त्‍रे विकत घेणार, हे निश्चित ऐतिहासिक आहे.

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्‍ट्र धोरण विश्‍लेषक, पुणे. (१३.२.२०२५)