‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सूक्ष्मातून ज्ञान मिळत नाही; पण त्यांना ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेले ज्ञान ‘चुकीचे आहे कि बरोबर आहे ?’, हे कळते. यागामील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.

१. विश्वमनापेक्षा विश्वबुद्धी अधिक सूक्ष्मतर असल्यामुळे विश्वबुद्धीच्या ज्ञानशक्तीद्वारे विश्वमनातून मिळालेले ज्ञान ‘योग्य आहे कि चुकीचे आहे’, हे पडताळता येणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना प्रामुख्याने काही ऋषिमुनी किंवा सिद्धपुरुष यांसारख्या दैवी शक्ती किंवा विश्वमन यांतून ज्ञान मिळत आहे. त्यामुळे ते विश्लेषणात्मक आणि विस्तीर्ण स्वरूपाचे असते. परात्पर गुरु डॉ. आठवले जेव्हा ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाच्या धारिका पडताळतात, तेव्हा त्यांना विश्वबुद्धीतून ज्ञानाच्या सत्यतेविषयी संक्षिप्त स्वरूपाचे ज्ञान मिळते. विश्वमनापेक्षा विश्वबुद्धी सूक्ष्मतर असल्यामुळे विश्वबुद्धीच्या स्तरावरील ज्ञानशक्तीद्वारे विश्वमनातून मिळालले ज्ञान ‘योग्य आहे कि चुकीचे आहे’, हे पडताळता येते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सूक्ष्मातून ज्ञान मिळत नसले, तरी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेले ज्ञान चुकीचे आहे कि बरोबर आहे ?, हे त्यांना कळते.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विश्वबुद्धीतून बीजरूपात प्रश्नांच्या स्वरूपात किंवा समाज, राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांच्याविषयी संक्षिप्त ज्ञान मिळणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना समाज, राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांच्याविषयी विश्वमनातून शब्दांच्या स्तरावर विस्तृत स्वरूपाचे ज्ञान मिळणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विश्वबुद्धीतून बीजरूपात प्रश्नांच्या स्वरूपात ज्ञान मिळते किंवा समाज, राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांच्याविषयी संक्षिप्त ज्ञान मिळते. जेव्हा हे ज्ञान सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळते, तेव्हा त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नांचे विश्वमनातून विस्तृत स्वरूपात उत्तर मिळते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आध्यात्मिक पातळी ९७ टक्के असल्यामुळे ते शिवात्मा-शिवदशेत असतात. ही अवस्था शब्दातीत असल्यामुळे त्यांची ‘परात्पर परा’ ही वाणी कार्यरत असते. शब्दातीत अवस्था ही आनंद आणि शांती यांची निर्गुण अवस्था आहे. शब्दातीत अवस्थेत केवळ अनुभूती येते आणि शब्दातीत ज्ञान अनुभवता येते. त्यामुळे शब्दातीत अवस्थेमध्ये शब्दजन्य ज्ञान प्राप्त करणे कठीण असते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना समाज, राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांच्याविषयी शब्दांच्या स्तरावरील ज्ञान मिळते. त्यामुळे संपूर्ण मानवजातीला या ज्ञानाचा लाभ होतो.’
३. सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळणारे ज्ञान आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मिळणारे ज्ञान यांतील भेद
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांना समाज, राष्ट्र, धर्म किंवा साधना यांच्या संदर्भात स्फुरलेले विचार लिहितात. त्यानंतर ते त्यांचे ‘तेजस्वी विचार’ या मथळ्याखाली ‘सनातन प्रभात’ या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध होतात. हे विचार अत्यंत प्रबोधनात्मक आणि चपखल असतात. त्यामुळे समाजातील हिंदूंचे राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम वाढून त्यांना धर्माचरण अन् साधना करण्याची प्रेरणा मिळते.
टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांना समाज, राष्ट्र, धर्म किंवा साधना यांच्या संदर्भात संक्षिप्त स्वरूपात ज्ञान मिळते. त्याचप्रमाणे ते सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेल्या ज्ञानाची सत्यता पडताळतात. सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त करण्यासह त्याची सत्यता पडताळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे दोन्ही सेवांना समान, म्हणजे ५० टक्के इतके महत्त्व आहे.
कृतज्ञता
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळणारे शब्दजन्य आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मिळणार्या शब्दातीत ज्ञानाची वैशिष्ट्ये समजली, यासाठी मी परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |