
१. ‘नामजप केल्यावर मला माझे शरीर आणि मन हलके झाल्यासारखे वाटले.
२. हनुमंतरायाच्या मंदिरात नामजप करतांना मला त्याच्या मूर्तीत प्रभु श्रीराम आणि माता सीतादेवी यांचे छायारूपी दर्शन झाले.
३. नामजप केल्यावर मला ‘गणित न समजणे’, अशी अभ्यासात येणारी विघ्ने दूर झाली, तसेच मी नामजप करून परीक्षेला बसल्यावर मला न येणार्या प्रश्नाचे उत्तरही येऊ लागले.
४. नामजप करत असतांना ‘देवतांच्या मूर्तीवर प्रसन्नतेचे हास्य असते’, असे मी अनुभवले.
५. नामजप केल्याने माझी स्मरणशक्ती वाढली असून माझ्या मनातील विचारही पुष्कळ उणावले आहेत.
६. नामजप करून माझे नकारात्मक विचार उणावले असून सकारात्मक विचार वाढले आहेत आणि देवाशी अनुसंधानही वाढले आहे.
७. मी बाहेर गेल्यावर रस्ता विसरलो. तेव्हा मी नामस्मरण करून प्रार्थना केल्यावर एका अनोळखी मुलाने मला रस्ता दाखवला. ‘त्याच्या रूपात साक्षात् भगवंताने मला रस्ता दाखवला’, असे मला वाटले.
८. ‘मी भगवंताला कुठलीही प्रार्थना केली की, ती पूर्ण होते’, असे मला वाटते.’
– कु. गौतम रार्चेला, (वय १५ वर्षे) सोलापूर. (४.१.२०२५)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |