कधी पाहू गुरुमूर्ती ।

‘१६.१.२०२४ या दिवशी असलेल्या भक्तीसत्संगाच्या वेळी परात्पर गुरुदेवांच्या आठवणीने मनात काहूर माजले. त्या वेळी मला पुढील कविता सुचली. ती कविता गुरूंच्या चरणी अर्पण करतो.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कैसी वर्णू चित्तवृत्ती ।
कधी पाहू गुरुमूर्ती ।। १ ।।

श्री. धैवत वाघमारे

लयाला जाती तापत्रय ।
लोचनी दिसता मूर्ती दिव्य ।। २ ।।

चित्त होई माझे अधीर ।
पहाण्या ती मूर्ती सुंदर ।। ३ ।।

आठविता क्षण तयासंगती ।
विसरतो मी कायामती ।। ४ ।।

वाटे आता फुटेल ऊर ।
न दिसता मजसी श्रीरूप ।। ५ ।।

प्रार्थितो येरे नारायणा ।
अधीर मी बंध तोडण्या ।। ६ ।।

शिकवण आठवे तयांची ।
दिशादर्शन करी प्रसंगापरी ।। ७ ।।

सनातन धर्म रूपे वसती चराचरी ।
साधकांसी तेची उद्धरती ।। ८ ।।

जयघोष माझ्या मनी जय गुरुदेव ।
दशदिशा उद्घोषती जय गुरुदेव ।। ९ ।।

– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१.२०२४)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक