रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

१. श्री. गणेश गायकवाड (रत्नागिरी जिल्हा प्रमुख, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान), खेडशी, रत्नागिरी, महाराष्ट्र.

अ. ‘आश्रमातील आनंददायी आणि तेजोवलयांकित वातावरणाची मला जाणीव झाली.

आ. ‘साधकांच्या चेहर्‍यावरील तेज’, हे माझे मुख्य आकर्षण होते.

इ. ‘आश्रमातील व्यवस्था आणि चैतन्य’ यांमुळे मला एका मंदिरात प्रवेश केल्याची अनुभूती आली.’

२. ह.भ.प. प्रकाश महाराज निवळकर (उपाध्यक्ष, कुंभार समाज संघटना, रत्नागिरी.) राजापूर, रत्नागिरी, महाराष्ट्र.

अ. ‘मला पुष्कळ आत्मिक समाधान वाटले. ‘आश्रमात प्रत्येक ठिकाणी ऊर्जा आहे’, असे मला जाणवत होते.’

आ. मला साधकांच्या चेहर्‍यांवरील भाव आणि नम्रता पाहून पुष्कळ समाधान वाटले.

इ. ‘त्यांच्या चेहर्‍यावरील हे भाव असेच राहोत’, अशी रुक्मिणी-पांडुरंग यांच्या चरणी प्रार्थना !’

३. श्री. सुनील सहस्रबुद्धे (दक्षिण रत्नागिरी समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ), केळये, रत्नागिरी, महाराष्ट्र.

अ. ‘मला आश्रम पाहून प्रसन्न वाटले.

आ. मला अत्याधुनिक, अत्यंत स्वच्छ, सात्त्विकभाव निर्माण करणारी आणि मंगलमय वास्तू पहायला मिळाली.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २५.६.२०२४)