मलंगगडावर जाणार्‍या हिंदूंना पोलिसांच्या नोटिसा

मलंगगड

ठाणे – माघी पौर्णिमेला कल्याण येथील मलंगगडावर उत्सव असतो. या पार्श्‍वभूमीवर येथील हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी नोटिसा पाठवल्या आहेत. त्यामुळे हिंदु भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मलंगगडावरील नवनाथांच्या स्थानाच्या ठिकाणी दर्गा बांधून मुसलमान तेथे पूजा करण्यापासून विरोध करतात. याविरोधातील हिंदूंचा लढा कित्येक वर्षे चालू आहे. ‘हिंदूंना नोटिसा पाठवणे, याचा अर्थ हिंदु समाजाची शांतता बिघडणे, असा होतो. प्रत्यक्षात मलंगगडावर मुसलमानांनी अतिक्रमण केले आहे आणि तेथील हिंदूंचे स्थान टिकवून ठेवणार्‍या हिंदूंना मात्र नोटिसा पाठवल्या जातात, हे दुर्दैवी आहे’, अशी चर्चा हिंदूंमध्ये आहे.

संपादकीय भूमिका

हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना असे होणे अपेक्षित नाही !