पुणे येथे विजयी आमदारांची हत्तीवरून मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

पुणे – विधानसभा निवडणुकीतील विजय साजरा करण्यासाठी पिरंगुटमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढत पेढे वाटप केले. मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या कार्यकर्त्यांवर वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वन विभागाने मांडेकर यांच्या मिरवणुकीचे संयोजक राहुल बलकवडे आणि हत्ती देणार्‍या सांगली येथील ‘श्री गणपति पंचायतन देवस्थान’च्या अध्यक्षांवर गुन्हा नोंद केला आहे.

१. २ फेब्रुवारी या दिवशी आमदार शंकर मांडेकर यांचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी ‘हत्तीवरून मिरवणूक आणि १२५ किलो पेढे वाटप’ कार्यक्रम आयोजित केला होता.

२. मांडेकर यांची हत्तीवरून मिरवणूक काढल्याची छायाचित्रे सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्यानंतर पुणे जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक आदित्य परांजपे यांनी या संदर्भातील माहिती गोळा केली.

३. कोल्हापूर परिमंडळाच्या अतिरिक्त मुख्य वन्यजीव संरक्षकांकडून संयोजकांना घालून दिलेल्या नियमांचा भंग आयोजकांनी केल्याचे निष्पन्न झाले.

४. सध्या हत्ती देवस्थानकडे असून त्याला कह्यात घेण्यात येणार आहे, अशी माहिती पौड वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी दिली.