विद्यार्थिनीसमवेत गैरकृत्य करणार्या वाहनचालकावर गुन्हा नोंद !
भंडारा – विद्यार्थ्यांना शाळेत नेणार्या वाहनचालकाने १० वर्षीय विद्यार्थिनीच्या धाकट्या भावाला मागे बसण्यास सांगून तिला पुढे बसवले. त्या वेळी त्याने तिच्या समवेत गैरकृत्य केले. मुलीने याविषयी पालकांना सांगितल्यावर त्यांनी वाहनचालक सुभाष फत्तुजी नेवारे (वय ३५ वर्षे) याच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून तो फरार आहे.
संपादकीय भूमिका : अशांना शाळेच्या वाहनचालक पदावरून काढायला हवे !
आई-वडील, शिक्षक यांना विसरू नका !
नवी मुंबई – आई-वडील आणि शिक्षक यांनी कष्टाने आपल्याला शिक्षण दिले. त्यांना कधीही विसरता कामा नये, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तुर्भे येथे केले.
डॉ. सी.व्ही. सामंत विद्यालय येथे झालेल्या शैक्षणिक व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ‘मागील १८ वर्षांपासून ही व्याख्यानमाला अविरत चालू आहे. या वर्षीही आम्ही १०० टक्के निकाल लावू. चंद्रकांत पाटील यांनी उत्तम प्रयोगशाळा आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. व्याख्यानमाला अविरत चालू ठेवू’, असा विश्वास मुख्याध्यापक सुनील कोळी यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन
अल्पवयीन मुलीसमवेत शारीरिक संबंध ठेवणार्या तरुणीवर गुन्हा नोंद !
दक्षिण मुंबई – येथे अल्पवयीन मुलीसमवेत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी २४ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार आणि ‘पोक्सो’चा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी तरुणीला अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. दोघींची ओळख झाल्यावर मैत्री होऊन तिचे रूपांतर प्रेमात झाले होते.
संपादकीय भूमिका : अश्लीलता आणि वासनांधता यांनी गाठलेली परिसीमा !
नागपूर येथे ४ वर्षांत येथील १११ अल्पवयीन मुला-मुलींची आत्महत्या !
नागपूर – गेल्या ४ वर्षांत येथील १११ अल्पवयीन मुला-मुलींनी आत्महत्या केली आहे. काहींनी गळफास घेतला, तर काहींनी विष प्राशन केले. १११ मध्ये ५९ मुलींचा समावेश आहे. मुलींचा वयोगट १५ ते १७ असा आहे. नागपूर पोलीस विभागातील नोंदीवरून ही माहिती उघड झाली आहे. परीक्षेची भीती, अभ्यासाचा ताण, घरातील तणावाचे वातावरण, आई-वडिलांचे रागावणे, भ्रमणभाषचे व्यसन, मैत्री आणि प्रेमसंबंध यांमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे यात म्हटले आहे. (संयमाचा अभाव आणि दिशाहीनता यांमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून पालकांनी सुसंवाद साधणे अन् मुलांवर वेळीच योग्य संस्कार करणे आवश्यक आहे ! – संपादक)